Ghulam Nabi Azad Latest News
Ghulam Nabi Azad Latest News Sarkarnama
देश

Ghulam Nabi Azad : आझाद स्वतंत्र पक्ष स्थापन करणार ; काश्मिरात पहिली शाखा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसचा (Congress Party) राजीनामा दिल्यानंतर एक नवीन माहिती समोर येत आहे. (Ghulam Nabi Azad latest news)

काँग्रेसचा त्याग केल्यानंतर गुलाम नबी आझाद आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करणार आहेत. येत्या १५ दिवसांत याच्या जम्मू-काश्मीर शाखेची स्थापना होईल. आझाद यांचे निकटवर्तीय नेते जी. एम. सरुरी यांनी शनिवारी नव्या पक्ष स्थापनेस दुजोरा दिला आहे.

सरुरी यांनीही काँग्रेस उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या समर्थकांशी विचारविनिमय करण्यासाठी गुलाम नबी आझाद ४ सप्टेंबरला जम्मूत येत आहेत.

आझाद यांच्यावर भाजपसोबत साटेलोटे करण्याच्या काँग्रेसच्या आरोपावर सरुरी म्हणाले, "त्यांच्यावर टीका करणारे वास्तवाकडे डोळेझाक करत आहेत. काँग्रेस नेतृत्वामुळे आझाद यांना राजीनामा देणे भाग पडले. ते एक धर्मनिरपेक्ष नेते आहेत. मात्र, आता जो पक्ष त्यांचा अपमान करतो त्या पक्षात ते कसे राहू शकतील,"

जी. एम. सरुरी म्हणाले, "आझाद यांच्या जाण्याने राज्यात काँग्रेस जवळपास संपुष्टात आली आहे. अनेक माजी मंत्री, आमदार, जिल्हा आणि तालुक्यातील विकास परिषदेतील सदस्यांसह १२ पेक्षा जास्त नेत्यांनी आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. जम्मू-काश्मीरची ५ ऑगस्ट २०१९ आधीची म्हणजे कलम ३७० हटवण्याआधीची स्थिती बहाल करणे पक्षाच्या जाहीरनाम्याचा भाग असेल,"

आझाद यांनी राजीनाम्या दिल्यानंतर सांगितले होते की सध्या राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याची कोणतीही घाई नाही. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीची शक्यता पाहता तेथे लवकरच शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन दिवसापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानी राजीनामा पत्र पाठवले आहे. सोनिया गांधींना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात गुलाम नबी आझाद यांनी लिहिले आहे की, ‘अत्यंत खेदाने आणि जड अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझे 50 वर्षांचे नाते तोडण्याचा निर्णय घेतला आहे.’ गुलाम नबी आझाद म्हणाले, भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढायला हवी.’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT