नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस (Congress) पक्षाचा सर्वात मोठा चेहरा समजले जाणारे गुलाम नबी आझाद ((Gulam Nabi Azad) यांनी प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीचे कारण सांगून त्यांनी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण आझाद पक्षासोबत खूश नसल्याचा दावा काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने केला आहे. (Gulam Nabi Azad resigned Congress)
सुरुवातीला त्यांच्याकडून कोणतेही कारण स्पष्ट करण्यात आले नाही. परंतु नंतर त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून राजीनामा दिला. मात्र जम्मूतील काँग्रेस नेत्या अश्विनी हांडा यांनी त्यांच्या राजीनाम्यामागे वेगळेच कारण सांगितले आहे. काँग्रेस पक्षाने जम्मू-काश्मीरसाठी स्थापन केलेल्या प्रचार समितीमध्ये तळागाळातील नेत्यांना डावलण्यात आले. त्यांना न्याय मिळाला नाही. काँग्रेसने स्थापन केलेल्या नव्या प्रचार समितीने तळागाळातील नेत्यांच्या आकांक्षांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे. याच कारणामुळे गुलाम नबी आझाद यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या नव्या समितीवरही ते समाधानी नव्हते, असे अश्विनी हांडा यांनी सांगितले.
दरम्यान, जर गुलाम नबी आझाद यांनी रागाच्या भरात पक्षाचा राजीनामा दिला असेल तर कॉंग्रेसमध्ये काही आलबेल नाही, असं चित्र दिसत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा असो किंवा काही मुद्द्यांवर पक्षाची भूमिका असो, गुलाम नबी आझाद आणि काँग्रेसमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद असल्याचे समोर आले होते. गुलाम नबी आझाद हे पक्षात अनेक मोठ्या बदलांचे समर्थन करणाऱ्या G23 चाही एक भाग आहेत. अशात त्या सर्व घडामोडींमध्ये या राजीनाम्याने गुलाम नबी आझाद आणि त्यांच्या काँग्रेससोबतच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मंगळवारी काँग्रेसने जम्मू-काश्मीर संघटनेत मोठा बदल केला. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी अनेक नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. पक्षाने ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची प्रचार समितीचे अध्यक्ष आणि तारिक हमीद करारा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. गुलाम नबी आझाद यांना राजकीय घडामोडी समिती आणि समन्वय समितीचे प्रमुख करण्यात आले. जाहीरनामा समितीचे प्रमुख असताना प्रा. सैफुद्दीन सोज आणि उपाध्यक्ष अधिवक्ता एम के भारद्वाज यांना करण्यात आले. प्रचार आणि प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी मुला राम यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र गुलाम नबी यांचा राजीनामा आणि त्यानंतर सुरू झालेल्या गोंधळामुळे काश्मीर खोऱ्यातील काँग्रेससमोरील आव्हाने वाढली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.