G7 Summit 2026 : फ्रांसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या G7 शिखर परिषदेदरम्यान अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या परिषदेत सहभागी झाले असून जगभरातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. याच परिषदेतील नेत्यांच्या भेटीदरम्यान झालेल्या मनमोकळ्या गप्पांचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. हॉट माइकमध्ये रेकॉर्ड झालेल्या या गप्पांची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.
इन्स्टाग्रामवर फेमस जोडी
फोटोसेशनवेळी पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट झाली. काही दिवसांपूर्वी मोदींनी इटलीच्या दौऱ्यावेळी मेलोडी या चॉकलेटचे पॅकेट मेलोनी यांना भेट दिले होती. मेलोनी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर त्याची जगभरात बरीच चर्चा झाली. मंगळवारी दोन्ही नेत्यांची पुन्हा भेट झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नकळतपणे तो मुद्दा काढला.
दोघांच्या भेटीनंतर मेलोनी म्हणाल्या, तुम्हाला पुन्हा भेटून चांगले वाटले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्राम पाहिले का, अशी हसतहसत विचारणा केली. त्यावर मेलोनी यांनी हसूनच उत्तर दिले. होय, आमची जोडी इन्स्टाग्रामवर खूप फेमस आहे, असे मेलोनी यांनी म्हणतात शेजारी उपस्थित असलेले इतर नेतेही हसू लागले. हा संपूर्ण संवाद हॉट माइकमध्ये रेकॉर्ड झाला आहे.
सिगारेट सोडली
जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी मेलोनी यांनी तुम्ही सिगारेट सोडली का, अशी विचारणा केल्याचे विधानही हॉट माइकमध्ये रेकॉर्ड झाले आहे. या प्रश्नावर मेलोनी यांनीही १ मेपासून सिगारेट ओढत नसल्याचे सांगितले. हे ऐकताच कॅनडा, जपान, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.
दरम्यान, जी७ परिषदेसाठी फ्रान्स, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान आणि ब्रिटन या देशांचे प्रमुख सहभागी झाले आहे. यूरोपीय संघाचे अधिकारीही या परिषदेत सहभागी झाले आहे. यावेळी भारत, ब्राझील, केनिया, दक्षिण कोरिया यूक्रेन या देशांसह अन्य काही देशांचे प्रमुखांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे या परिषदेला महत्व प्राप्त झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.