Keral Politcs|
Keral Politcs| 
देश

Hindutva| 'मुली आणि मुलांनी एकत्र वर्गात बसणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही'

सरकारनामा ब्युरो

तिरूअनंतपुरम : मुली व मुलांनी वर्गात एकत्र बसणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. जे तरुण विद्यार्थी 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत किंवा महाविद्यालयात आहेत, त्यांनी एकत्र बसू नये किंवा एकमेकांना मिठी मारू नये कारण ते अजूनही शिकत आहेत. असे विधान केरळमधील एझावा समुदायाचे नेते वेल्लापल्ली नटेसन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

केरळमधील डाव्या लोकशाही आघाडीच्या (एलडीएफ) नेतृत्वाखालील सरकारच्या लैंगिक तटस्थता धोरणाबाबत रविवारी (२८ ऑगस्ट) प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना नटेसन यांनी हे वक्तव्य केलं आहे. लैंगिक तटस्थता धोरणाबाबत राज्य सरकारला विविध मुस्लिम संघटनांकडून टीकेला सामोरे जावे लागत असताना नटेसन यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नटेसन म्हणाले की, आपण अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये राहत नाही. मुली आणि मुलांनी वर्गात एकत्र बसणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. मुलींनी आणि मुलांनी वर्गात एकत्र बसणे आम्हाला मान्य नाही. आपली स्वतःची अशी एक संस्कृती आहे. आपली संस्कृती मुले-मुली एकमेकांना मिठी मारणे आणि एकत्र बसणे स्वीकारत नाही. ख्रिश्चन आणि मुस्लिम शैक्षणिक संस्थांमध्येही हे होताना दिसत नाही.

नायर सेवा संस्था (NSS) आणि श्री नारायण धर्म परिपालन योगम (SNDP) व्यवस्थापित शैक्षणिक संस्थांमध्ये अशा गोष्टी घडत असल्याचेही यावेळी नटेसन यांनी सांगितले. एनएसएस आणि एसएनडीपी या राज्यातील दोन प्रमुख हिंदू जातीय संघटना आहेत. विद्यार्थ्यांच्या अशा वर्तनामुळे अराजकता निर्माण होते आणि हिंदू संघटनांनी स्थापित केलेल्या महाविद्यालयांमध्ये तुम्ही ते पाहिले असेल. मुले मोठी झाली की त्यांना हवे ते करू शकतात.पण भारतात मुलांनी एकत्र बसून एकमेकांना मिठी मारणे योग्य नाही. असेही त्यांनी म्हटले आहे. एलडीएफ सरकार, स्वतःला धर्मनिरपेक्ष सरकार म्हणवून घेत असूनही, ते धार्मिक दबावापुढे झुकत आहे आणि आपल्याच निर्णयांवर ठाम राहू शकत नाही. यातून समाजात चुकीचा संदेश जातो,अ्सही त्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT