priyanka chaturvedi, smriti irani sarkarnama
देश

Smriti Irani : भाजप मंत्री स्मृती इराणींच्या समर्थनार्थ शिवसेना खासदार मैदानात

झोईश इराणी ही गोव्यात एका बनावट लायसन्सवर बार रेस्टॉरंट चालवत आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भाजपच्या नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (smriti irani) यांची १८ वर्षीय कन्या झोईश इराणी ही गोव्यात एका बनावट लायसन्सवर सिली सोल्स अँड बार या नावाने बार रेस्टॉरंट चालवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने काल (शनिवारी) केला. त्यानंतर स्मृती इराणींच्या कन्येच्या समर्थनार्थ शिवसेना खासदार मैदानात उतरल्या आहेत. (Smriti Irani latest news)

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (priyanka chaturvedi) या झोईश इराणी यांच्यामागे ठाम उभ्या आहेत. त्यांनी याबाबत टि्वट केलं आहे. चतुर्वेदी म्हणाल्या, "एका अठरा वर्षांच्या मुलीला खलनायक ठरवून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एका अठरा वर्षांच्या मुलीला हॉटेल सुरु करण्यासाठी परवाना लागतो हे पण माहित नसते,"

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखाद्या मुलीने असे केले असेल तर त्या चुक काय आहे, एका अठरा वर्षांच्या मुलींला असे बदनाम करणे चुकीचे आहे. मी एका १९ वर्षांच्या मुलीची आई असल्याने हा विषय समजू शकतो. माझ्या भूमिकेचा राजकारणाशी संबध नाही,"

झोईश इराणी ही गोव्यात एका बनावट लायसन्सवर सिली सोल्स अँड बार या नावाने बार रेस्टॉरंट चालवत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसने शनिवारी केला. काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेडा, सरचिटणीस जयराम रमेश व गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिल्ली व पणजी येथे स्वतंत्र पत्रकार परिषदांमध्ये इराणी यांच्यावर हा आरोप केला. मात्र माझी कन्या महाविद्यालयात शिकत असून ती कोणताही बार चालवत नसल्याचे सांगत स्मृती इराणी यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्डमध्ये केलेल्या ५ हजार कोटींच्या लुटीच्या संदर्भात मी पत्रकार परिषद घेतली हा माझ्या मुलीचा गुन्हा आहे. तसेच, मी राहुल गांधी यांच्याविरोधात दोनदा लोकसभा निवडणूक लढवली हाही माझ्या मुलीचा गुन्हा आहे, अशी उपरोधिक टीका इराणी यांनी केली. "या प्रकरणी मी लोकांच्या न्यायालयातही न्याय मागेन," असे त्या म्हणाल्या.

काँग्रेस नेतृत्वाच्या आदेशावरून काँग्रेसच्या प्रवक्ते माझ्या मुलीला अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांनी २०२४ मध्ये अमेठीतून पुन्हा लोकसभा निवडणूक लढावी. त्यांना पुन्हा पराभवाची धूळ चाखावी लागेल, असे आव्हान इराणी यांनी यावेळी दिले.

काही महिन्यापूर्वी निधन झालेल्या एका व्यक्तीच्या नावाने स्मृती इराणींच्या मुलीच्या नावाने चालविण्यात येत असलेल्या बार आणि रेस्टॉरंटचा परवाना घेण्यात आला. गोव्यातील कायद्यानुसार एका रेस्टॉरंटला एकाच बारचा परवाना मिळतो. झोईश इराणींच्या बारला दोन परवाने मिळाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT