Goa CM Pramod Sawant  Sarkarnama
देश

Pramod Sawant : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मराठी राजभाषा दर्जाच्या मागणीला बगल?स्पष्टीकरण देत म्हणाले, 'कोकणी राज्यभाषा तर'

Marathi - Konkani Dispute : गोव्यात मराठी आणि कोकणी वाद होत असल्याचा चर्चा असतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यांनी, गोव्यात मराठी कायम सहभाषा राहणार असून मराठीतून व्यवहार करण्यास कोणीच अडवलेलं नाही, असे म्हटलं आहे.

Aslam Shanedivan

Panaji News : गोव्यात गेल्या काही दिवसांपासून कोकणी भाषेप्रमाणेच मराठी भाषेलाही राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. यामागणीला पुन्हा जोर धरला असतानाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावर सूचक भाष्य केलं आहे. त्यांनी, गोव्यात मराठी आणि कोकणी वाद आता संपला असून कोकणी राज्यभाषा तर मराठी सहराज्यभाषा असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकला आहे. तर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या मागणीला बगल दिली आहे.

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून कोकणी भाषेप्रमाणेच मराठी भाषेलाही राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली जातेय. अशीच मागणी 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातही करण्यात आल्याने आता या मुद्द्याने पुन्हा उचल खाल्ली आहे. याबाबत साहित्य संमेलनात मराठी ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर आता आता गोव्यात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

याच वादावर आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सूचक वक्तव्य करताना, गोव्यात कोकणी-मराठी वाद संपल्याचे म्हटलं आहे. ते गोवा मराठी अकादमी व साखळी रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सृजन संगम या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. यावेळी सावंत यांनी, कोकणी आणि मराठी दोन्ही भाषा गोव्यात समानतेने चालत आहेत. गोव्यात दोन्ही भाषांचे महत्त्व अबाधित असून कोणाताही वाद नाही. तर गोव्यात परप्रांतीय लोकांची वाढती संख्या लक्षात घेऊन नोकरीसाठी कोकणी सक्तीची केली आहे. यामुळे मराठीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

दरम्यान गोव्यात कोकणी-मराठी वाद सुरू झाल्यानंतर सरकारच्या निर्णयावरून मराठीप्रेमींकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली होती. याच टीकेवरून सावंत यांनी प्रतिक्रिया दिली. समाजात वावरत असताना, आपले भविष्य घडवत असताना आपल्यावर चांगले संस्कार असणे आवश्यक आहे. खुप पैसा आहे, पण संस्कार नाही. मग त्या पैशाचा काय फायदा? त्यासाठी संस्कार व मनशांती महत्वाची आहे. मराठी ही संस्काराची भाषा असून लहान मुलांवर संस्कार रूजविण्याची क्षमता या भाषेत असल्याचे प्रतिपादन सावंत यांनी केले आहे.

तसेच सावंत यांनी, माझे देखील बारावीपर्यंतचे शिक्षण मराठीतून झालं असून पैशेच म्हणजे सर्वस्व नाही. संस्कार देखील महत्वाचे आहेत. योग्य संस्कारच आपल्याला योग्य रस्ता दाखवतात. तेच नसतील तर लोक वेगळ्या मार्गाला देखील जातात. मराठी ही संस्काराची भाषा असल्याचे ते म्हणाले.

तर गोव्यात मराठी आणि कोकणी वाद आता राहिलेला नसून कोणाला मराठीतून व्यवहार करण्यास कोणीच अडवलेलं नाही. कोकणी राज्यभाषा असली तर मराठी कायम सहभाषा राहणार आहे. गोव्याला मराठीची मोठी परंपरा आहे. ती परंपरा टिकवून ठेवण्यासाठी वाचन, लिखाण आणि चिंतन करावे लागेल', असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT