Goa CM Pramod Sawant resigns Sarkarnama
देश

मोठी घडामोड : मुख्यमंत्री सावंतांचा राजीनामा; गोव्यात राजकीय हालचालींना वेग

गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले असले तरी मुख्यमंत्रिपदाचा तिढा पक्षासमोर निर्माण झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्ये भाजपला यश मिळाले आहे. गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाचा तिढा पक्षासमोर निर्माण झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज राज्यपालांना भेटून राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात मिळणार याची उत्सुकता ताणली गेली आहे.

गोव्यात (Goa) विधानसभेच्या ४० पैकी २० जागा भाजपला (BJP) मिळाल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने गोव्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. असे असताना मुख्यमंत्रिपदावरून गटबाजी उफाळली आहे. याला प्रमोद सावंत (Pramod Sawant) याचा निसटता विजयही कारणीभूत आहे. साखळी मतदारसंघातून सावंत यांचा केवळ ६६६ मतांनी विजय झाला आहे. सावंत यांच्या खराब कामगिरीमुळे पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळे सावंतांची विकेट पडून मुख्यमंत्रिपदासाठी दुसरे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे.

राणेंचे सूचक वक्तव्य

भाजप नेते आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची नाराजी पुढे आली असून त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांना थेट पाठिंबा देण्याविषयीच्या प्रश्वावर बोलणं टाळलं होतं. राणे यांना गोव्याचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की, हा संवेदनशील प्रश्न आहे. त्यामुळे मी आत्ता काहीही बोलणार नाही.

दरम्यान यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री पदावर असताना मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. त्यावेळी राणेंचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, त्यावेळी राणे यांना थांबवून प्रमोद सावंत यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात सरकारचा गाडा हाकताना दोघांमधील मतभेद सातत्याने बाहेर येत होते. गोव्यात आता भाजपला अन्य अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप बहुमत सिद्ध करून सत्तास्थापनेचा दावा करणार हे स्पष्ट आहे, मात्र त्यापूर्वी भाजपला अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागू शकतो.

फडणवीसांचं मौन

मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर देणं टाळलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस म्हणाले आहेत की, निकालानंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होतं असते. त्यानंतर निरीक्षक राज्यांमध्ये जाऊन विजयी आमदारांशी आणि जेष्ठ्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात. त्यानंतर नाव घोषित केले जाते. गोव्यातही हीच प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतरच मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT