Pramod Sawant, Viriato Fernandes Sarkarnama
देश

Pramod Sawant News : गोव्याची CM प्रमोद सावंतांनी वाट लावली, राज्याला 'ड्रग कॅपिटल' केलं

Sachin Waghmare

Political News : गोव्यातील हणजूण परिसरात रात्री दहानंतर सुरु असणाऱ्या संगीत पार्ट्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या संगीत पार्ट्यांमुळे गोव्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. न्यायालयाने आदेश देऊन देखील राज्यात कायद्याला न जुमानता रात्री उशीरापर्यंत संगीत पार्ट्या सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असल्याचा आरोप यावेळी खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला.

गोव्यामध्ये रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या संगीत पार्ट्याविरोधात संतप्त नागरिकांनी आंदोलन केले. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस (Viriato Fernandes) यांना भाग घेतला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी गोव्याची वाट लावली, त्यांनी राज्याला गुन्हे तसेच ड्रग कॅपिटल केल्याची टीका खासदार विरियातोंनी केली. (Pramod Sawant News)

गोव्याच्या विनाशासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच जबाबदार आहेत. राज्यातील ड्रग कल्चर देखील त्यांच्यामुळेच असल्याचा आरोपही यावेळी विरियातो यांनी केला आहे. हणजूण भागातील ध्वनी प्रदूषण उल्लंघनाविरोधात आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी विरियातो यांनी दिला.

उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्यावर मी काही बोलणार नाही, असे विरियातो म्हणाले. आवाज बंद झालेल्या नेत्याला जर संसदेत पाठवले तर असेच होईल, याचे जाण उत्तर गोव्यातील लोकांना व्हायला हवी, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

स्थानिक नागरिक करणार आंदोलन

येत्या 19 डिसेंबरला मुख्यमंत्री सावंतांना राज्याचे ड्रग, मर्डर आणि रेप कॅपिटल केल्याप्रकरणी त्यांना टायटल देऊया, असेही विरियातो म्हणाले. दरम्यान, हणजूण पोलिसांनी थलासा रेस्टॉरंट विरोधात रात्री दहानंतर देखील मोठ्या आवाजात संगीत सुरु ठेवल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. रात्री दहानंतर मोठ्या आवाजात संगीत सुरु ठेवणाऱ्या रेस्टॉरंट क्लब विरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिक करत असून, हे आंदोलन आता तीव्र झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT