पणजी : पणजी महापालिकेच्या महापौरपदी आज रोहित मोन्सेरात (Rohit Monserrate) यांची बिनविरोध फेरनिवड झाली. तर उपमहापौरपदी संजीव नाईक यांना संधी देण्यात आली आहे. महापालिकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला. पणजी महापालिकेवर भाजप आमदार आणि सध्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात (Atanasio Monserrate) यांच्या गटाचे बहुमत आहे. मोन्सेरात गटाकडे अर्थात भाजप पॅनलकडे २५ नगरसेवक आहेत. तर विरोधी गटाकडे फक्त ५ नगरसेवक आहेत.
गतवर्षी मार्च महिन्यात पणजी महापालिका निवडणुकीत रोहित मोन्सेरात हे पहिल्यांदाच नरगसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र त्यानंतरही बाबूश यांनी मुलगा रोहित यांना पणजीच्या महापौरपदी बसवले. त्यानंतर आता यावर्षी देखील रोहित मोन्सेरात यांचीच महापौरपदी फेरनिवड झाली आहे. रोहित यांच्या निवडीने गोव्याचे विशेषतः पणजीचे राजकारण मोन्सेरात यांच्या भोवती फिरत आहे.
कारण स्वतः बाबूश मोन्सेरात हे भाजपचे पणजी मतदार संघातून आमदार आणि सावंत सरकारमध्ये मंत्री आहेत. तर त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात याही भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. त्या देखील सावंत यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री होत्या. त्यामुळे आता गोव्यात आणि मोन्सेरात कुटुंबाध्ये वडिल मंत्री, आई आमदार, मुलगा महापौर असे चित्र पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.