Narendra Modi and Satyapal Malik
Narendra Modi and Satyapal Malik Sarkarnama
देश

काही दिवस गप्प बसा, तुम्हाला राष्ट्रपती करतो! खुद्द राज्यपालांनीच ऑफर केली उघड

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष सुरू आहे. याचबरोबर इतरही राज्यांत असाच संघर्ष सुरू आहे. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करीत आहेत. त्यांना राष्ट्रपतिपदाची ऑफर देण्यात आली असून, यासाठी काही दिवस गप्प बसण्याची अट घालण्यात आली आहे. खुद्द मलिक यांनीच हा गौप्यस्फोट केला आहे.

राज्यपाल (Governor) सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी हरियानातील कंडेला गावात खाप पंचायतीने आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. या वेळी बोलताना मलिक म्हणाले की, मला गप्प बसण्यासाठी राष्ट्रपतिपदाची (President) ऑफर देण्यात आली आहे. पद हे काही कायम नसते. मी चौधरी चरणसिंह यांच्यासोबत काम केले आहे. ते मला त्यांच्या मुलाप्रमाणे वागणूक देत. मी आता तुम्हाला सांगतो की, तुम्ही रस्त्यावरील आंदोलन बंद करा. तुम्ही तुमचे सरकार स्थापन करा आणि सरकार बदला. कुणाकडे भीक मागण्याची आवश्यकता नाही.

एक कुत्रा मेला तरी दिल्लीतून शोकसंदेश जाहीर केला जातो. मात्र, 700 शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्यानंतर एकही शोकसंदेश जाहीर करण्यात आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंदोलनस्थळापासून केवळ 10 किलोमीटर अंतरावर राहतात. तरीही त्यांनी या समस्येवर कोणताही मार्ग शोधला नाही. यामुळे संतप्त होऊन मी रज्यपालपद सोडून आंदोलनात सहभागी होण्याची विचार केला होता. याची माहिती देण्यासाठी मी केंद्रातील एका मंत्र्याकडे गेल होते. त्यावेळी मंत्र्यांनी मला काहीही करा पण राजीनामा देऊ नका, असा सल्ला दिला होता.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मला मोदींनी काय उत्तर दिले, हे तुम्हाला मी सांगणार नाही. परंतु, ते उत्तर अतिशय दु:खदायक होते. त्यावेळी मी निर्णय घेतला की मी बोलत राहणार. माझ्या मित्रांनी मला यावर सल्ला दिला. तुम्ही गप्प बसलात तर तुम्हाला राष्ट्रपती अथवा उपराष्ट्रपती बनवतील. अशा पदांना मी लाथ मारतो, असे मी थेटपणे त्यांना सुनावले, असेही राज्यपालांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT