CJI dhananjay chandrachud, Bhagat Singh Koshyari
CJI dhananjay chandrachud, Bhagat Singh Koshyari Sarkarnama
देश

Supreme Court Live : मुख्यमंत्री शिंदेना न्यायालयाचा दुसरा दणका; राज्यपालांची कृती बेकायदेशीर; न्यायालयाचा मोठा निर्णय

Amol Jaybhaye

SC Decision on Shiv Sena : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) जाहीर झाला. यामध्ये न्यायालयाने निर्णय दिला की ''तत्काली राज्यपाल भतसिंह कोश्यारी यांच्याकडे बहुमत चाचणी बोलवण्यासाठी कोणतेही योग्य कागदपत्रे नव्हती. त्यामुळे राज्यापालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमताच्या चाचणीचे आदेश दिले हे बेकायदेशीह होते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

राज्यापालांची कृती ही बेकायदेशीर होती, राज्यापालांची भूमिका योग्य नाही, असे न्यायालायने म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी व्हिप म्हणून जी भरत गोगावले यांची नियुक्ती केली होती. ती सुद्दा न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे शिंदे गटाला दुसरा मोठा धक्का न्यायालयाने दिला. (Political Breaking News)

शिवसेना ठाकरे गटाने 16 आमदारांना व्हिप पाळला नाही, म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या आमदारांना नोटीस बजावली होती. त्या नोटिशीच्या विरोधात १६ आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले होते, या आमदारांचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे गेला आहे.

सुरुवातील 2 न्यायाधीशांच्या समोर आणि त्यानंतर माजी सरन्यायाधीश व्ही. एन. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे ११ जुलै २०२२ पासून सुनावणी झाली. याच खंडपीठाने हे प्रकरण पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली न्या. हिमा कोहली, न्या. एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. पी नरसिंहा या पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्यात आले होते. (Political Web Stories)

या घटनापीठाच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने सुनावणीला सुरुवात झाली होती. ता. १४ फेब्रुवारीपासून दोन्ही बाजूकडून युक्तीवाद करण्यास सुरूवात झाली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद १२ दिवस, ४८ तास झाला. यातील पहिले ३ दिवस प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचे की नाही यावर युक्तिवाद करण्यात आला होता.

त्यानंतर 21 फेब्रुवारी ते 16 मार्च प्रत्येक आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी झाली. आणि 16 मार्च रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला गेला होता. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला. तर शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवी, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी, मणिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. 14 फेब्रुवारीपासून 12 दिवस 48 तास कामकाज करत सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली. 9 महिन्यानंतर ही सुनावणी पूर्ण झाली. महाराष्ट्रच नव्हे तर देशासाठीही हा निकाल महत्वाचा असणार आहे. (Political Short Videos)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT