Petrol rate Hike
Petrol rate Hike Sarkarnama
देश

पोटनिवडणुकांत दणका बसल्याचा परिणाम : डिझेल 10 रुपयांनी तर पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त

सरकारनामा ब्यूरो : शुक्रवार, 7 जानेवारी 2021

नवी दिल्ली : देशात काल झालेल्या विविध पोटनिवडणुकांत भाजपला दणका बसल्याने पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलमध्ये पाच रुपयांनी आणि डिझेलमध्ये दहा रुपयांची घट होण्याची चिन्हे आहेत. या निवडणूक निकालाच्या दणक्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हे दर कमी झाले तरी पेट्रोल शंभरच्या वरच राहणार आहे.

त्यामुळे पुण्यासारख्या शहरात पेट्रोल आता 115.52 रुपयांवरून 110 रुपये प्रति लिटरने मिळेल. डिझेल हे 104.67 पैशांवरून पुन्हा शंभर रुपयांच्या आत म्हणजे 94 रुपये प्रति लिटरने मिळेल. हे दर तीन नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

विविध राज्यांतील पोटनिवडणुकांच्या कालच्या निकालात भाजपला दणका बसला. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या पराभवाचे खापर महागाईवर त्यातही विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर फोडले होते. उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत या दरवाढीचा फटका बसण्याचा धोका लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने यावर तातडीने पावले टाकली आहेत. या आधी केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करण्यास नकार देत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT