Gujarat Assembly Election 2022
Gujarat Assembly Election 2022 
देश

Gujarat Election Results 2022 : भुपेंद्र पटेलांनी रचला इतिहास; घाटलोडियातून बहुमताने विजयी

सरकारनामा ब्युरो

Gujarat Assembly Election 2022:  घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, पटेल यांना 23,713 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या उमेदवार अमीबेन याज्ञिक यांना 3,840 मते मिळाली. या जागेवर आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय पटेल सध्या 2,168 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या पाटीदार-बहुल घाटलोडिया मतदारसंघाने गुजरातला भूपेंद्र पटेल आणि आनंदीबेन पटेल असे दोन मुख्यमंत्री दिले आहेत. हा भाजपचा बालेकिल्ला आहे. 2017 मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनानंतरही भूपेंद्र पटेल यांनी 1.17 लाख मतांनी ही जागा जिंकली होती. या निवडणुकांनंतर राज्याची कमान पटेल यांच्याकडेच राहणार असल्याचे भाजपने आधीच जाहीर केले आहे. अहमदाबाद जिल्ह्यातील घाटलोडिया विधानसभा जागा ही राज्यातील सर्वात लोकप्रिय जागा आहे. येथून जो निवडणूक जिंकतो तो थेट मुख्यमंत्री होतो. 2008 च्या मतदार संघांमध्ये फेरबदल झाल्यानंतर ही जागा अस्तित्वात आली आणि 2012 मध्ये येथे प्रथमच निवडणूक झाली.

2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल येथून विजयी झाले होते आणि यावेळी पुन्हा ते याच जागेवरून निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसने येथून अमीबेन याज्ञिक यांना तिकीट दिले आहे. त्याचवेळी आम आदमी पक्षाने विजय पटेल यांना उमेदवारी दिली आहे. घाटलोडिया हा पाटीदार बहुल परिसर आहे. यासोबतच रबारी समाजाचेही येथे वर्चस्व आहे.

आतापर्यंत झालेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपने ही जागा जिंकली आहे. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत आनंदीबेन पटेल यांनी ही जागा जिंकली होती. आनंदी बेन यांनी काँग्रेसचे रमेश भाई पटेल यांचा १.१० लाख मतांनी पराभव केला. एकूण 9 उमेदवार रिंगणात होते. भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार वगळता इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT