Bharatsinh Solanki
Bharatsinh Solanki  Sarkarnama
देश

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अडचणीत! दुसऱ्या महिलेसोबत पत्नीनं रंगेहाथ पकडलं

सरकारनामा ब्युरो

अहमदाबाद : काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी (Bharatsinh Solanki) हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social) व्हायरल झाला आहे. त्यांच्या पत्नीनेच व्हिडीओ बनवला असून, आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Bharatsinh Solanki News)

भारतसिंह सोलंकी यांच्या पत्नी रेश्मा पटेल यांना त्यांचा पती एका महिलेसोबत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्या तातडीनं काही लोकांना घेऊन तिथ पोचल्या. त्यांनी घरात घुसून सोलंकींच्या सोबत असलेल्या महिलेला मारहाण सुरू केली. या वेळी इतर लोकांनी याचा व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर पोस्ट केला. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत रेश्मा पटेल त्या महिलेला गुजराती भाषेत बोलताना तसेच, मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ काढला जात असताना महिलेने आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत रेश्मा पटेल म्हणाल्या की राजकीय प्रभावाचा वापर करुन अनेक वेळा सोलंकी यांनी माझ्यावर अन्याय केला. याआधीही भरतसिंह यांनी मला घरातून बाहेर काढले होते. मात्र, मी कुटुंबासाठी परदेशात निघून गेले होते. आता मी पुन्हा भारतात आले आहे. मी घटस्फोट देणार नाही.

भरतसिंह सोलंकी हे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे पुत्र आहेत. रेश्मा आणि भरतसिंह यांच्यात सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे. याआधीही या पती-पत्नींनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले होते. काही महिन्यांपूर्वी भरतसिंह सोलंकी यांच्यावर पत्नीने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. मात्र, असे असूनही त्यांनी भरतसिंह यांना घटस्फोट देण्यास नकार दिला होता. पटेल यांनी पतीविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. मागील अनेक वर्षांपासून हा वाद सुरू आहे. आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT