Gujrat Election
Gujrat Election  Sarkarnama
देश

Gujarat Election : गुजरात निवडणुका आज होणार जाहीर, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद!

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा: गुजरात निवडणुकीच्या तारखा आज दुपारी १२ वाजता जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग आज दिल्लीतील रंगभवन सभागृहात पत्रकार परिषद घेणार आहे. तारखा जाहीर होताच संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहितेची अधिसूचना जारी होणार आहे.

2017 मध्ये स्वीकारलेल्या परंपरेचा दाखला देत निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या तारखांसह गुजरात निवडणुका जाहीर केल्या नाहीत. हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या मतमोजणीची तारीख मतदानानंतर जवळपास एक महिन्यानंतर ठेवत गुजरातसाठीही मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होईल, असे स्पष्ट संकेत दिले होते. 2017 मध्ये देखील दोन्ही राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना निवडणुका जाहीर झाल्या होत्या, परंतु मतमोजणी एकाच वेळी 18 डिसेंबर रोजी झाली होती.

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये 1998, 2007 आणि 2012 मध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका झाल्या. 182 सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेची मुदत 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT