Bhupendra Patel met Prime Minister Narendra Modi  Sarkarnama
देश

गुजरात भाजपचे बडे नेते PM मोदींच्या भेटीला; विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करणार?

Gujrat | BJP | Narendra Modi | Aam Aadami Party : गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग

सरकारनामा ब्युरो

गांधीनगर : गुजरातमध्ये यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक नियोजित आहे. मात्र काल रात्रीपासून गुजरातमध्ये (Gujrat) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल (Bhupendra Patel), मंत्री राजेंद्र त्रिवेदी आणि मुख्य सचिव कैलाशनाथन यांनी दिल्लीत जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर भाजप (BJP) गुजरातची विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करुन निवडणूक घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. (Gujarat Legislative Assembly news)

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही ट्विट करुन याबाबतचा प्रश्न विचारला आहे. भाजप पुढील आठवड्यात विधानसभा भंग करुन निवडणुकांची घोषणा करणार आहे का? आम आदमी पक्षाची एवढी भिती? असा सवाल त्यांनी विचारला आहे. अशातच अरविंद केजरीवाल हे आज गुजरात दौऱ्यावर आहेत. यात छोटूभाई वसावा यांच्यासह महासंमेलन घेणार आहेत.

दिल्ली, पंजाब ही राज्य काबिज केल्यानंतर केजरीवाल यांची नजर आता गुजरात आणि हिमाचल प्रदेश या भाजपशासित राज्यांवर आहे. या दोन्ही राज्यांमधील आम आदमी पक्षाच्या वाढत्या ताकदीमुळे इथल्या विधानसभा निवडणुका मुदतपूर्व घेण्याचा किंवा स्थगित करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याच संदर्भातून कालची भेट आहे का? असा सवाल केजरीवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह गुजरातचा दौरा केला आहे. यात अहमदाबादचा रोड शो आणि जाहिर सभेचा समावेश होता. केजरीवाल यांनी यावेळी भाजपशासित राज्यातील नागरिकांना आपल्याला एक संधी देण्याचे आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT