Gujrat Local Body Election: देशात भाजप आणि काँग्रेस हे परस्पर भिन्न विचारसरणीचे आणि प्रमुख विरोधक असलेले राजकीय पक्ष आहेत. त्यामुळं इतर कुठलेही राजकीय पक्ष येतील येतील पण भाजप काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत अशी सर्वसामान्यांचा ठाम विश्वास आहे. पण असं असलं तरी स्थानिक निवडणुकांमध्ये हे समजही बऱ्याचदा गळून पडतात.
महाराष्ट्रातही नुकत्याच पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये हा प्रकार घडला होता. पण दोन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर संबंधिंतांवर कारवाई देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये पुन्हा काँग्रेस-भाजप उघडपणे एकत्र आल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी यांनी ट्विट करत भाजप-काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपचे नेते मनिष सिसोदिया यांचं ट्विट रिट्विट करताना म्हटलं की, "गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन आप विरोधात निवडणूक लढवत आहेत. आता हे लोक उघडपणे एकत्र आले आहेत" तसंच सिसोदियांनी ट्विटमध्ये म्हटलं की, गुजरातमध्ये काँग्रेस-भाजपचं डबल इंजिन सरकार चालत आहे. भाजपचे आमदार सांगत आहेत की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवारांनी देखील हेच ठरवलं आहे. तर दुसरीकडं काँग्रेसचे वरिष्ठ नेते जनतेला सांगत आहेत की, भलेही भाजपला भेट द्या पण आपपासून दूर राहा.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांना पत्र लिहून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आपच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात सुनियोजित कारवाई केल्याचा आरोप लावला होता. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत याच मुद्द्यावर भेटीसाठी वेळही मागितली होती. या पत्रात केजरीवाल यांनी राज्यात गेल्या तीन महिन्यात दाखल करण्यात आलेल्या १४५ एफआयआर आणि १६० हून अधिक अटकेच्या कारवाया यांचा हवाला दिला होता. त्याचबरोबर आरोपही लावला होता की, भाजप सरकार आपच्या कार्यकर्त्यांना निशाणा बनवत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.