Amit Shah
Amit Shah Sarkarnama
देश

Gujrat Election : अमित शहाच म्हणतात, गुजरातमध्ये आजही काँग्रेसचा जनाधार!

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी गुजरात विधानसभची तिरंगी लढत होत असण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. गुजरातमधील तीन उदाहरणे देत शाह यांनी आम आदमी पक्षाला यश मिळण्याची शक्यताच नाकारली. काँग्रेस आणि आप यांच्यातील मतांची देवाणघेवाण भाजपविरोधी मतांसाठी फायदेशीर ठरेल का, यावरही त्यांनी उत्तर दिले. भाजपचा मतसंख्या आणि जागा वाढणार असल्याचा दावा शाह यांनी केला.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांना विचारण्यात आले की गुजरातमध्ये 'आप' फॅक्टर आहे का? यावर शहा म्हणाले, “मीडियामध्ये नक्कीच आहे. गुजरातमध्ये याआधीही तीन मोठ्या पक्षांनी निवडणूक तिरंगी करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला चिमणभाईंनी पक्ष स्थापन करून तिरंगी लढाई करण्याचा निर्णय घेतला, पण त्यात अपयश आल्याने त्यांना पक्ष बंद करावा लागला. शंकरसिंग वाघेला आणि केशुभाई पटेल यांनीही तिरंगी लढत होण्यासाठी पक्ष स्थापन केला, पण अयशस्वी ठरल्याने त्यांना पक्ष संपवावा लागला. कुणालाही ५ पेक्षा जास्त जागा कधीच मिळाल्या नाहीत. तिरंगी निवडणुका हे गुजरातचे स्वरूप नाही.

तिरंगी निवडणूक झाल्यास मतांच्या विभाजनाचा भाजपला फायदा होणार नाही का, असा प्रश्न शहा यांना विचारण्यात आला. यावर शहा म्हणाले, “जेव्हा मला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळतात, तेव्हा मते कुठे आणि कशी वाटली जातात याचा काही फरक पडत नाही. यावेळी भाजपला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळणार आहेत.” दारू घोटाळा आणि सत्येंद्र जैन यांचा गुजरात निवडणुकीशी संबंध जोडण्याच्या केजरीवालांच्या प्रयत्नावर शहा म्हणाले की, जनता यावर विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसचा प्रभाव ओसरत चालला असून त्याची जागा कोण घेणार, असे बोलले जात आहे. शहा म्हणाले, “भाजपही भरू शकते, आमचे मतही वाढू शकते. प्रत्येक वेळी जनता पर्याय शोधत नाही. अनेकवेळा असे घडते की जनता सत्ताधारी पक्षाला बळ देते.

भाजपची मते वाढत असून ती कोणाच्या बाजूने येत आहेत हे कोणीही सांगू शकत नाही, असे शहा म्हणाले. भाजपच्या जागाही वाढत आहेत. काँग्रेस पक्ष विधानसभेत आणि जमिनीवर प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेलची मते वाढतील किंवा कमी होईल, पण त्यांचा जनाधार अजूनही कायम आहे. प्रत्येक पक्षाचा एक जनाधार आहे, आमचीही घट-वाढ होऊ शकते, पण काँग्रेस जमिनीवर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT