Gulam Nabi Azad Sarkarnama
देश

Gulab Nabi Azad : आझादांचं बंड तीन महिन्यांतच थंड; 30 संस्थापक सदस्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

Congress News : निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब होणं बाकी असतानाच डेमोक्रेटिक आझाद पार्टी संकटात

सरकारनामा ब्यूरो

Gulab Nabi Azad : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी आपल्या नव्या पक्षाची स्थापना केली होती. डेमोक्रेटिक आझाद पार्टी असं पक्षाचं नावही ठेवलं होतं. यानंतर हिंदू, मुस्लिम, शीख आणि ईसाई या सर्वांचा हा पक्ष असेल असंही आझाद यांनी म्हटलं होतं. मात्र, स्थापना झाल्यानंतर काही महिन्यांतच गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रेटिक आझाद पार्टी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

गुलाम नबी आझाद यांच्या डेमोक्रेटिक आझाद पार्टी पक्षाच्या ३० हून अधिक संस्थापक सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आझाद यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कारण यामध्ये पक्षाचे सरचिटणीस निजामुद्दीन खटाना यांचांही समावेश आहे. पक्ष नोंदणीसाठी आझाद यांना मंगळवारी निवडणूक आयोगात बोलावण्यात आलं होतं. डेमोक्रेटिक आझाद पार्टी हे नावही लोकांनी दिलं आहे.

या नावावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. मात्र, त्याचदिवशी संस्थापक सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानं पक्षात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

गुलाम नबी आझाद (Gulab Nabi Azad) यांचा पक्ष स्थापन झाल्यापासून तीन महिन्यातच अनेक लोक पक्ष सोडून जात आहेत. याआधी १७ जणांनी गुलाम नबी आझाद यांचा पक्ष सोडला होता. आता मंगळवारी ३० संस्थापक सदस्यांनी पक्षाला रामराम केला आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयराम रमेश यांनी ट्विट करत आझाद यांना डिवचलं आहे. त्यांनी DAP म्हणजे 'डिसअपियिरिंग आझाद पार्टी असं आहे असं ट्विट केलं होतं.

याचवेळी त्यांनी जसे मी काल सूचित केले होते, आज जम्मूमध्ये गायब झालेल्या आझाद पक्ष आणि इतर पक्षांमधून काँग्रेसमध्ये पक्षांतर झालं आहे. लवकरच श्रीनगरहून काँग्रेसचं असंच विमान परत येईल अशा शब्दांत आझाद यांना टोला लगावला आहे.

डेमोक्रेटिक आझाद पार्टी पक्षाचे सरचिटणीस निजामुद्दीन खटाना यांच्यासह सुमारे ३० संस्थापक सदस्य काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. खटाना हे दोन वेळा आमदार असून त्यांनी मागील वर्षी पीडीपी पक्षाला रामराम ठोकत आझाद यांच्या पक्षात प्रवेश केला होता. मात्र, यानंतर अवघ्या तीन महिन्यातच खटाना यांनी पक्षातून बाहेर पडत काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत आझाद यांना धक्का दिला आहे.

यावेळी त्यांच्यासोबत निजामुद्दीन खटाना यांचा मुलगा गुलजार खटाना यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT