Gulam Nabi Azad
Gulam Nabi Azad Sarkarnama
देश

Gulam Nabi Azad : आझाद यांचं बंड थंड : तब्बल १७ नेत्यांनी साथ सोडत, पुन्हा धरला काँग्रेसचा 'हात'!

Chetan Zadpe

Gulam Nabi Azad : काँग्रेस नेतृत्वावर नाराजी दर्शवत, पक्षाला रामराम करणारे काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांचे बंड आता थंड होताना दिसून येत आहे. आझाद यांनी काँग्रेसशी बंड करत डेमोक्रेटिक आझाद पक्षाची स्थापना केली होती. मात्र आता त्यांच्यासोबत गेलेले १७ नेत्यांनी पुन्हा काँग्रेसचा 'हात' धरला आहे.यामुळे आता आझाद यांचे बंड फसल्याचे बोलेले जात आहे.

कधीकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले गुलाम नबी आझाद यांनी २६ ऑगस्ट रोजी काँग्रेसची साथ सोडली होती. पक्षाला रामराम केल्यानंतर आझाद यांच्या सोबत, जम्मू काश्मीरमधील काँग्रेसच्या पाच बड्या नेत्यांनी काँग्रेस सोडली होती. मात्र आझादांनी डेमॉक्रॅटिक आझाद पक्षाची स्थापना केल्यानंतर आता त्यांच्या या नव्या राजकीय पक्षाचे भविष्य अधांतरी दिसत आहे. कारण पक्ष स्थापन होण्याच्या काही महिन्यातच पक्षाला गळती लागली आहे.

जम्मू-काश्मीरचे एकेकाळी उपमुख्यमंत्री राहिलेले ताराचंद यांच्यासह इतरही १७ नेत्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यामुळे आता आझाद यांना हा मोठा धक्का मानण्यात येतो.

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या सर्व नेत्यांचे पुन्हा काँग्रेसमध्ये स्वागत केले आहे. वेणुगोपाल यांनी यावेळी म्हंटले की, भारत जोडो यात्रा आता जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होणार आहे. मात्र त्यापूर्वीच आमचे पूर्वीचे सहकारी, आमचे अनेक नेते पुन्हा आपल्या घरी येत आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे

माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह, जम्मू काश्मीर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष पीरजादा मोहम्मद, यासोबत इतरही महत्त्वाचे १५ नेते पु्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी नेते काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हंटले की, पुढील काळात आझाद यांच्या पक्षातून अनेक नेते काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत.

आझाद यांच्या पक्ष स्थापनेनंतरही काहीच कालावधीत मतभेद दिसून येत होते. यामुळेच काही दिवसांपूर्वी तारा चंद व इतर काही नेत्यांची आझाद यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आता आझाद यांचा जवळपास फुटून गेला असेच चित्र आहे. आझादांच्या पक्षातून अनेक नेते बाहेर पडत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT