Election Commission Sarkarnama
देश

Election Commissioner News : काँग्रेस नेत्यानं फोडली नव्या निवडणूक आयुक्तांची नावं...

Adhir Ranjan Chowdhury News : अधीर रंजन चौधरी हे निवड समितीचे सदस्य आहेत. आज झालेल्या बैठकीनंतर चौधरींनी माध्यमांना याबाबत माहिती दिली.

Rajanand More

New Delhi News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अरुण गोयल यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयुक्तपदाचा (Election Commissioner News) राजीनामा दिला. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. विरोधकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. निवडणूक आयुक्तांची दोन्ही पदे रिक्त झाल्याने सरकारवर टीका सुरू होती. त्यामुळे सरकारकडून नव्या आयुक्तांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते.

निवडणूक (Election) आयुक्तांच्या निवडीसाठी उच्चस्तरीय समिती आहे. आज या समितीची दिल्लीत बैठक झाली. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे या समितीचे सदस्य आहेत. बैठकीनंतर चौधरींनी मीडियाशी बोलताना केरळमधील ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) आणि पंजाबमधील सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाल्याचा दावा केला. तसेच केंद्र सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांनी दोन आयुक्तांची नावंही जाहीर करून टाकली. अद्याप निवडणूक आयोगाकडून (Election Commission) ही नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

चौधरी (Adhir Ranjan Chowdhary) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय विधी मंत्री अर्जुन राम मेघवाल बैठकीला होते. बैठकीला जाण्यापूर्वी मी संभाव्य नावांची छोटी यादी मागवली होती. निवडीआधी एक छोटी यादी तयार केली जाते, म्हणून ही मागणी केली होती. दिल्लीत पोहाेचताच ती यादी मिळाली असती तर अधिकाऱ्यांविषयी माहिती घेण्यासाठी वेळ मिळाला असता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मला जी यादी मिळाली त्यामध्ये 212 जणांची नावे होती. काल रात्रीच मी दिल्लीत आलो आणि आज सकाळी 12 वाजेपर्यंत बैठकीला जाण्यापूर्वी सर्व नावांची माहिती घेणे शक्य नव्हते. त्यामुळे या नावांचा विचार करून काय फायदा. आमच्या समितीमध्ये विरोधी पक्षांतील मी एकटाच आहे. सुरुवातीपासूनच बहुमत सरकारकडे आहे. त्यामुळे सरकारला हवे तेच होणार आहे. सरकारच्या इच्छेनुसारच निवडणूक आयुक्तांची निवड होणार, असे म्हणत चौधरींनी नाराजी व्यक्त केली.    

दरम्यान, अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामुळे निवडणूक आयोगातील आयुक्तांच्या दोन्ही खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. त्यामुळे निवडणुकीच्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची जबाबदारी वाढली होती. पुढील आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधीच दोन्ही आयुक्तांची निवड करणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार चौधरी यांच्या दाव्यानुसार निवड करण्यात आली आहे.  

R  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT