Santosh Patil  Sarkarnama
देश

कंत्राटदार पाटील आत्महत्या : ‘भाजपच्या युवा नेत्याचा हात; वेळ आल्यावर नाव उघड करणार’

काँग्रेस आणि भाजपमधील प्रत्येकी एक युवा नेता आक्षेपार्ह सीडी तयार करणे, ती एडीट करून ब्लॅकमेल करण्याचे काम करतात.

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil) आत्महत्या प्रकरणात केवळ काँग्रेस (congress) नेत्याचाच नाही, तर भाजपच्या (BJP) युवा नेत्याचा हात असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचेच आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केला. वेळ येताच त्याचे नाव उघड करू, असे ते विजापूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भाजपचे प्रधान सचिव अश्वत्थ नारायण यांनी बेळगावातील एका काँग्रेस लोकप्रतिनिधीवर या प्रकरणी ठपका ठेवला आहे. (Hand of a young BJP leader in the case of contractor Santosh Patil suicide : Patil-Yatnal)

काँग्रेस आणि भाजपमधील प्रत्येकी एक युवा नेता आक्षेपार्ह सीडी तयार करणे, ती एडीट करून ब्लॅकमेल करण्याचे काम करतात. कर्नाटकात दोन सीडी कारखाने आहेत. एक भाजप युवा नेत्याचा व दुसरा काँग्रेसच्या महानेत्याचा. कर्नाटकात सुसंस्कृत राजकारण आहे. मात्र, काही जणांकडून ते बिघडविले जात आहे. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या बोलण्यात तथ्य आहे, असे बसनगौडा पाटील-यत्नाळ म्हणाले.

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाची चौकशी केल्यास काँग्रेसच्या एका आमदाराचे नाव घेऊन प्रकरण त्यांच्याभोवती फिरत असताना दिसेल, असा नवा बाँम्ब भाजपचे महासचिव सी. एन. अश्वत्थ नारायण यांनी टाकला आहे. होसपेटे येथील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. बेळगावातील लोकप्रतिनिधी भोवती हे प्रकरण फिरत आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून काही दिवसांतच सत्य समोर येईल. कोणत्याही प्रकारची चौकशी करा, पण त्वरीत तपास करा. याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल, असे अश्वत्थ नारायण म्हणाले.

भाजपचे नुकसान करण्यासाठीच हे घडवले...

काँग्रेस नेते राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यांना राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. बेळगावातील एका मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास वस्तुस्थिती समोर येईल, असेही ते म्हणाले. भाजपचे नुकसान करण्यासाठी हे प्रकरण घडवण्यात आले, असाही संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. हे प्रकरण राज्य सरकारने गांभीर्याने घेतले, असे अश्‍वत्थ नारायण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT