अहमदाबाद : गुजरात (Gujarat) काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्षाला रामराम केला आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. पटेल हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता खुद्द पटेल यांनीच मौन सोडून थेट उत्तर दिलं आहे. (Hardik Patel Latest News)
हार्दिक पटेल हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांच्या गुप्त बैठका दोन महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा होती. यामुळे काँग्रेसला रामराम केल्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी ते भाजपमध्ये उडी मारतील, असे बोलले जात होते. अखेर त्यांनीच यावर खुलासा केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, जनता कंटाळल्यानंतर आपोआप काँग्रेसला मतदान करेलय मी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींशी गुजरातमधील परिस्थितीबाबत चर्चा केली होती. त्यांनी विचारलं म्हणूनच ही माहिती मी त्यांना दिली होती. त्यानंतर मला दुर्लक्षित करण्यात आलं. त्यामुळं मी अखेर दु:खानं नव्हे तर धैर्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
मी अद्याप भाजपमध्ये गेलेलो नाही. तसेच, याबाबत माझा अद्याप निर्णय झालेला नाही. गुजरामध्ये पाटीदार समाज अथवा इतर कोणताही समाज असो, त्यांना काँग्रेसमध्ये त्रास सहन करावा लागला आहे. काँग्रेसमध्ये खरे बोलल्यास त्या व्यक्तीला बदनाम केले जाते. हीच त्यांची रणनीती असते, असेही हार्दिक पटेल म्हणाले.
हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे ट्विट करीत जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातची जनता स्वागत करेल. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.
गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नुकतेच राज्यात दाखल झाले होते. हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचे ताकदवान नेते आहेत. ते नाराज असल्याने पक्षातील मतभेद उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर खुद्द राहुल गांधी यांच्यासोबत हार्दिक पटेल मंचावर दिसले होते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात राहुल गांधींनी पटेल यांना भेट देणे टाळले होते. तसेच, त्यांच्याशी चर्चाही केली नव्हती. त्यामुळे हार्दिक यांची नाराजी कायम होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.