नवी दिल्ली : काँग्रेससमोर (Congress) आणखी एका राज्यात संकट उभे ठाकल्याचे चित्र होते. गांधी कुटुंबीयांशी अत्यंत जवळीक असलेले ज्येष्ठ नेते व उत्तराखंड (Uttarakhand) माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) यांनी पक्ष सोडण्याचे थेट संकेत दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांची दिल्लीत राहुल गांधींची (Rahul Gandhi) भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पक्षाचे नेतृत्व आणि मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे.
हरीश रावत यांच्याशी आज राहुल गांधी यांनी आज चर्चा केली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, रावत म्हणाले की, उत्तराखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी प्रचार प्रमुख आहे. यामुळेच मी काँग्रेसचे नेतृत्व करणार आहे. याबाबत मी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यात येईल. निवडणूक झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली जाईल. या बैठकीत निर्णय घेऊन तो पक्षाच्या अध्यक्षांकडे पाठवला जाईल. त्यावर अंतिम निर्णय अध्यक्ष घेतील. हा निर्णय सर्वांना मान्य असेल.
उत्तराखंड काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी रावत यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष गणेश गोडियाल आणि पक्षाचे नेते यशपाल आर्य यांनाही दिल्लीला बोलावण्यात आले होते. या बैठकीत अंतर्गत मतभेदांवर तोडगा काढण्यात आला. याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत रावत हेच पक्षाचा चेहरा असतील, असा शब्द त्यांना देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. त्यासाठी रावत यांनी जोरदार तयारीही सुरू केली होती. पक्षांच्या बैठकांसह भाजपच्या (BJP) आमदारांना पक्षात घेण्याची रणनीतीही त्यांनी बनविली होती. पण त्यांनी अचानक पक्षावर ट्विटबॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली होती. रावत यांना त्यांच्या या ट्विटबद्दल विचारणा करण्यात आली होती. त्यावर ते म्हणाले होते की, वेळ येईल त्यावेळी सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर मांडेन. मी तुमच्याशी नाही तर दुसऱ्या कुणाशी बोलणार? मी तुम्हाला कॉल करेन. तोपर्यंत तुम्ही केवळ मजा बघा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.