New Delhi : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारत भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली. या निवडणुकीत ओबीसी आणि दलित मतदारांनीही भाजपला पसंती दिल्याचा दावा नेत्यांकडून केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला साथ दिलेल्या दलित मतदारांनी यावेळी मात्र साथ दिली नाही, असे चित्र आहे.
लोकनीती CSDC च्या सर्व्हेनेही काँग्रेसची चिंता वाढवली आहे. कोणत्या समाजाने कोणत्या पक्षाला साथ दिली, याची चर्चा सुरू असताना या सर्व्हेतून कोणत्याही जातीची एक गठ्ठा मते कोणत्याही पक्षाला मिळाली नसल्याचे समोर आले आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये मतांची विभागणी झाली आहे.
हरियाणात प्रामुख्याने दलित आणि ओबीसी मतांची चर्चा झाली. सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार, सुमारे 50 जाटव मतदारांनी काँग्रेसला मतदान केले. तर या समाजाची 35 टक्के मते भाजपला मिळाली. इतर अनुसूचित जातींची 45 टक्के मते भाजपला मिळाली. तर काँग्रेस पारड्यात केवळ 33 टक्के मते पडली.
सत्तेत परतण्यासाठी काँग्रेसची मदार जाट आणि दलित मतांवर होती. पण भाजपने या दोन्ही समाजाची मते घेत काँग्रेसचा पराभव केल्याचे स्पष्ट झाले आहे. हरियाणात एससी आरक्षण असलेल्या 17 जागा आहे. त्यापैकी भाजपने आठ जागांवर विजय मिळवला. उर्वरित नऊ जागा काँग्रेसला मिळाला. विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदयबान यांचाही पराभव झाला. मागील निवडणुकीत भाजपने या 17 पैकी पाच जागा जिंकल्या होत्या.
भाजपने जाट समाजाची मते मिळवण्यातही कंबर कसली होती. त्यात या पक्षाला यश आल्याचे दिसते. सोनीपत रोहतक आणि जिंद जिल्ह्यांत अनेक जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. या जागा जाटबहुल आहेत. जाट समाजाचा गढ असलेल्या पाच जागा भाजपने जिंकल्या आहेत. भाजपने काँग्रेसची व्होट बॅंक असलेल्या जाट आणि दलित मते फोडल्याने पुन्हा सत्ता मिळाल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.