Congress setback hisar ramniwas rada joins bjp Sarkarnama
देश

Haryana Congress: हरियाणा काँग्रेसला मोठा झटका; अनेक नेते, पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Congress setback hisar ramniwas rada joins bjp: 2024 च्या विधानसभेत पराभव झाल्यानंतर रामनिवास राडा यांनी माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राडा यांनी सोमवारी हिसार नगरपालिकेच्या महापौरपदासाठी अपक्ष अर्ज दाखल केला होता.

सरकारनामा ब्यूरो

हिसार येथे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीतील उमेदवार रामनिवास राडा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हिसार काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बिहारीलाल राडा. युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित आणि हिसार लोकसभा युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष भूपेंद्र सनेत यांच्यासह दोन डझन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हिसार काँग्रेसला खिंडार पडले आहे.

मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. भाजपचे हिसार जिल्हा अध्यक्ष अशोक सैनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रामनिवास राड़ा यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर हिसार विधानसभा लढवली होती.

त्यानंतर 2024 मध्येही ते काँग्रेसचे विधानसभा उमेदवार होते. दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 30 हजार मते मिळाली होती.

2024 च्या विधानसभेत पराभव झाल्यानंतर रामनिवास राडा यांनी माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राडा यांनी सोमवारी हिसार नगरपालिकेच्या महापौरपदासाठी अपक्ष अर्ज दाखल केला होता. निवडणुक लढण्याची घोषणा केली होती.

आज भाजपने त्यांना आपल्या पक्षात सामावून घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 2014 मध्ये त्यांनी हरियाणा जनहित काँग्रेस पार्टीकडून बरवाला विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT