Haryana MLA Kiran Choudh quit Congress
Haryana MLA Kiran Choudh quit Congress  Sarkarnama
देश

Kiran Choudhry: काँग्रेसला दे धक्का; माजी मुख्यमंत्र्यांची सून किरण चौधरी यांचा राजीनामा; माय-लेकी भाजपमध्ये प्रवेश करणार

Mangesh Mahale

Haryana Congress Faces a Big Blow: लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. हरियाणा काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्या, आमदार किरण चौधरी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांची सून असलेल्या किरण चौधरी (kiran choudhry) आणि त्यांची मुलगी माजी खासदार श्रुती चौधरी (Shruti Choudhy) यांनी आपले राजीनामे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवले आहेत.

श्रुती चौधरी या काँग्रेसच्या हरियाणा युनिटच्या कार्याध्यक्ष होत्या. किरण चौधरी या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या प्रतिस्पर्धी मानल्या जातात. हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या काळात त्या मंत्री होत्या.

चौधरी माय-लेकींचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यावर हरियाणा भाजप आणखी मजबूत होईल. त्यांच्या भाजप प्रवेशाचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे चौधरी यांनी एक्सवर म्हटलं आहे. खर्गे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात चौधरी यांनी भूपिंदर सिंग हुडा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

हरियाणा काँग्रेस ही स्वत:ची मालमत्ता असल्याप्रमाणे भूपिंदर सिंग हुडा हे वागत होते, असे चौधरी यांनी पत्रात म्हटलं आहे. किरण चौधरी या हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या उपस्थितीत आज भाजप मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT