Gujrat CM news : 
देश

Gujrat CM news : ठरलं तर ! भुपेंद्र पटेलांनी घेतली राज्यपालांची भेट; नव्या मंत्रिमंडळाची यादीही तयार?

गुजरातमधील विधानसभेच्या 182 पैकी 156 जागा जिंकून भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला.

सरकारनामा ब्युरो

Gujrat News CM Update : गुजरातमधील विधानसभेच्या 182 पैकी 156 जागा जिंकून भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पुन्हा एकदा राजभवनात राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. शनिवारी (10 डिसेंबर) राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन हंगामी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील दिल्लीला रवाना झाले. भूपेंद्र पटेल 20 कॅबिनेट मंत्र्यांसह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

आज सायंकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान नव्या मंत्रिमंडळाच्या नावांबाबत नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. तत्पूर्वी शनिवारी भाजपच्या प्रदेश मुख्यालय कमलम येथे नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. भाजपचे वरिष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बीएस येडियुरप्पा आणि अर्जुन मुंडा हे केंद्रीय निरीक्षक म्हणून विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. गुजरातच्या नवनिर्वाचित आमदारांनी भूपेंद्र पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नामनिर्देशित करण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.

भुपेंद्र पटेल यांच्या नव्या मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्री

1. ऋषिकेश पटेल, विसनगर
2. शंकर चौधरी, थराद 
3. हर्ष संघवी, मजुरा
4. जगदीश पंचाल
5. जयेश रादडिया, जेतपुर
6. अनिरुद्ध दवे, मांडवी
7. अल्पेश ठाकोर, गांधीनगर दक्षिण
8. किरीटसिंह राणा, लिंबडी
9. मनीषा वकील
10. कुंवरजी बावलिया, जसदन 
11. राघवजी पटेल, जामनगर ग्राम्य
12. कनुभाई पटेल, साणंद
13. कीर्ती पटेल
14. रिवाबा जाडेजा

भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा १२ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. यामध्ये पीएम मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संसदीय मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, पटेल यांना 23,713 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या उमेदवार अमीबेन याज्ञिक यांना 3,840 मते मिळाली.

अभियंता असलेले भूपेंद्र यांनी नगरसेवक पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. भूपेंद्र पटेल यांचा जन्म १५ जुलै १९६२ रोजी अहमदाबादमध्ये झाला. लोक भूपेंद्र दादा म्हणतात. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे पाटीदार आहेत. पाटीदार आंदोलन संपवण्यातही भूपेंद्र यांची महत्त्वाची भूमिका होती. भूपेंद्र हे अनेक पाटीदार संघटनांचे प्रमुखही आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT