Uddhav Thackeray Eknath Shinde News  Sarkarnama
देश

Shiv Sena News : हरीश साळवेंच्या युक्तीवादावर कपिल सिब्बलांचा जोरदार आक्षेप

Supreme Court Hearing : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Thackeray vs Shinde In SC : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरु झाली आहे. तूर्त पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. मागील सुनावनीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचाच्या वकिलांनी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी केली होती. ही मागणी मान्य होणार का? हे पाहने महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाकरे गटाचे वकिल कपील सिब्बल युक्तीवाद करत आहेत. एका प्रकरणामुळे, तुम्ही अपात्रतेपासून वाचू शकत नाही. अध्यक्षांवर फक्त एका नोटीशीनुसार आपण अविश्वास ठराव आणू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच रेबिया केस ही महाराष्ट्रातील प्रकरणाशी लागू होत नाही, असा मुद्दा सिब्बल यांनी मांडला आहे. तसेच हे प्रकरण सात न्यायमुर्तींच्या घटना पीठाकडे गेले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

तर शिंदे गटाते वकिल हरीश साळवे यांनीही युक्तीवाद केला. नबाम रेबिया प्रकरणाला ठाकरे गटाचा विरोध आहे, असे साळवे म्हणाले. त्यावर त्यावर सिब्बल यांनी आक्षेप घेतला. विधानसभेचे कामकाज सुरू असताना, अविश्वास ठराव आला नाही, असे सिब्बल यांनी न्यायालयात सांगितले. तर विधानसभा अध्यक्षांऐवजी राज्यपालांनी अधिवेशन बोलावले. असे सिब्बल म्हणाले.

न्यायालयाचे काय निर्देश असतील. पुढे काय होणार, शिंदे सरकारचे भवितव्य काय असेल? याकडे संपूर्ण देशाच लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरु आहे. या घटनापीठात न्या. शहा, न्या. मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिंमा यांचा समावेश आहे.

सत्तासंघर्षप्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्‍चित केले आहेत. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्‌द्‌यावरून ठाकरे गटामार्फत 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात 20 जून 2022 रोजी दाखल झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT