Heeraben Modi News Update :
Heeraben Modi News Update : 
देश

Heeraben Modi News Update : हिराबेन मोदी अनंतात विलीन

सरकारनामा ब्युरो

Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुजरात येथील गांधीनगर याठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज (दि.30) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास निधन झालं. त्यांनी शंभराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान मोदी हे आईच्या अंतिम दर्शनासाठी सकाळीच गांधीनगरमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मातोश्री हीराबेन यांच्या पार्थिवाचं दर्शन घेत श्रध्दांजली वाहिली.

त्यानंतर काही वेळातच हीराबेन मोदी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्याघरी हीराबेन यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.

पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हीराबेन मोदी यांच्या निधनानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह देश विदेशातील राजकीयसह सर्वच क्षेत्रातून पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे.

आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा भास व्हायचा असं म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT