Jharkhand Political News : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी समाधानकारक उत्तरे न दिल्याने ईडीने अटक केल्याची माहिती आहे. दरम्यान, सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी चंपाई सोरेन आता झारखंडच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून सूत्रे होती घेणार आहेत.
चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. ते राजकारणात येण्यापूर्वी शेती करत होते. ते शिबू सोरेन यांचे सहकारी राहिले आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन अनेकदा चंपाई सोरेन यांच्या पाया पडताना दिसले आहेत. हेमंत सोरेन ईडीच्या कचाट्यात अडकल्यानंतर झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची बुधवारी दुपारी दीड वाजल्यापासून राहत्या घरी त्यांची चौकशी करण्यात येत होती. यावेळी चौकशीत सोरेन यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने ईडीने त्यांना अटकेचा निर्णय घेतला. सोरेन यांना अटक होण्याची शक्यता बळावल्यानंतर सत्ताधारी आघाडीने नवा नेता निवडून सरकार स्थापन करण्याची तयारी केली. त्यासाठी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली होती. पक्षाने चंपाई सोरेन यांची विधीमंडळ नेता म्हणून निवड केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली होती. त्या बैठकीत असे ठरले की त्यांना अटक झाल्यास नव्या नेत्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर बुधवारी सकाळपासूनच सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार मुख्यमंत्री भवनात जमले होते. चौकशीदरम्यान, सांयकाळी पाच वाजता ईडीकडून हेमंत सोरेन यांना अटक होण्याचे संकेत मिळाले. त्यानंतर झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला.
दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानातून सोमवारी (ED) ईडीने ३६ लाख रुपये रोख, दोन लक्झरी कार आणि काही कागदपत्रे जप्त केली होती. याबाबत ईडीने त्यांना अनेक प्रश्न विचारले. सोरेन यांनी रोख रक्कम आणि कार आपली असल्याचे नाकारले. याशिवाय रांचीच्या बडगई भागात सुमारे चार एकर जमिनीच्या मालकीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर सोरेन यांच्या उत्तरांवर ईडीचे अधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. यानंतर सोरेन यांना अटक करण्याचा निर्णय ईडीने घेतल्याचे बोलले जाते.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.