Hemant Soren 1 Sarkarnama
देश

Hemant Soren : हेमंत सोरेन यांनी एकट्यानेच सीएम पदाची का घेतली शपथ, कारण आलं समोर...

Hemant Soren 14th Chief Minister Jharkhand India Alliance : झारखंडच्या 14व्या मुख्यमंत्रीपदी हेमंत सोरेन यांनी एकट्याने शपथ घेतल्याचे महत्त्वपूर्ण कारण समोर आले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी गुरुवारी चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रांची येथील मोरहाबादी मैदानावर शपथविधीचा भव्य सोहळा झाला. या शपथविधी सोहळ्याला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत उपस्थित होते.

यावेळी हेमंत सोरेन यांनी एकट्याने शपथ घेतली. सोरेने यांनी एकट्यानेच शपथ घेतल्याचे कारण आता समोर आले आहे. ते म्हणजे, मंत्रिमंडळाबाबत इंडिया आघाडीतील मित्रपक्षांमध्ये एकमत नव्हते.

सोरेन यांना हवे असते, तर ते त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांना शपथ देऊ शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. 2019 मध्ये हेमंत सोरेन यांनी तीन कॅबिनेट सहकाऱ्यांसह शपथ घेतली होती. त्यापैकी एक त्यांच्या पक्षाचा आणि दोन काँग्रेस पक्षातील होते. 81 सदस्यीय झारखंड विधानसभेत जेएमएमच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने 56 जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीएने 24 जागा जिंकल्या आहे.

महाविकास इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांपैकी झारखंड मुक्ती मोर्चाने 34 जागा जिंकल्या, तर काँग्रेसने (Congress) 16 जागा जिंकल्या. RJD ने 4 जागा जिंकल्या आणि CPI-ML पक्षाने 2 जागा जिंकल्यात. हेमंत सोरेन यांनी मंत्रिमंडळावर एकमत होण्याची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांनी JMM मंत्र्यांना आपल्यासोबत शपथ घ्यायला लावली असती, तर तो एकतर्फी निर्णय मानला गेला असता विरोधकांना इंडिया आघाडीच्या एकतेवर तोंडसुख घेण्याची संधी मिळाली असती.

हेमंत सोरेन यांनी शपथ घेऊन विरोधकांना कोणताही मुद्दा दिला नाही. झारखंडच्या मंत्रिमंडळात 11 कॅबिनेट मंत्री असू शकतात. गेल्या टर्ममध्ये सहा मंत्री JMMचे होते, तर चार मंत्री काँग्रेसचे होते. यावेळी दोन आमदार असलेल्या CPI-ML पक्षाचे, हेमंत सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच JMM पक्षाला, काँग्रेस आणि RJD पक्षाला मध्ये कॅबिनेट बर्थ विभागले जाणार आहेत.

दिल्लीत लॉबिंग

JMM पक्षाला आपल्या कोट्यातून 7 मंत्री मंत्रिमंडळात ठेवायचे आहेत. त्यासाठी पक्षाकडून आमदारांच्या संख्याबळाचा आधार घेतला जात आहे. त्याचवेळी, गेल्या वेळेप्रमाणेच या वेळीही काँग्रेस 4 मंत्रीपदांवर ठाम आहे. RJD पक्षाला देखील मंत्रीपदाची इच्छा आहेत. यावर तोडगा निघाला नाही. काँग्रेसने अद्याप सोरेन यांना मंत्र्यांची यादी सादर केलेली नाही. कारण पक्षात अनेक दावेदार आहेत. परिस्थिती अशी आहे की बहुतांश आमदार दिल्लीत लॉबिंग करत आहेत. त्यामुळे सर्वोच्च नेतृत्व संभ्रमात आहे.

काँग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी रस्सीखेच

निवडणुकीपूर्वी हेमंत सोरेन यांनी मंत्रिमंडळात फेरबदल केले. तेव्हा काँग्रेस आमदारांमधील कलह चव्हाट्यावर आला होता. दीपिका पांडे सिंह, डॉ. इरगन अन्सारी, वरिष्ठ नेता ममता देवी, कुमार जयमंगल सिंह, राजेश कच्छप, भूषण बारा और नमन बिक्सल कोंगाडी या काँग्रेस नेत्यांकडून मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT