Arvind Kejriwal Latest News
Arvind Kejriwal Latest News Sarkarnama
देश

केजरीवालांना गुजरात पोलिसांनी ऑटोतून जाण्यास रोखल्याने रंगला हाय व्होल्टेज ड्रामा; व्हिडिओ व्हायरलं...

सरकारनामा ब्यूरो

Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे गुजरात दौऱ्यावर असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ताकदीने काम सुरू केले आहे. आज (ता.१२ सप्टेंबर) त्यांनी दिवसभर ऑटो चालकांशी संवाद साधला आणि एका ऑटोचालकाच्या घरी जेवणाचे निमंत्रणही स्विकारले.

मात्र त्यांच्या घरी जेवायला ते ऑटोमध्ये जात असताना त्यांना गुजरात पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत ऑटोमधून जाण्यापासून रोखल्याने केजरीवाल यांनी गुजरात पोलिसांची व्हिआयपी सुरक्षा नाकारत पोलिसांना चांगलेच सुनावले आहे. यावेळी मोठा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. केजरीवालांचा हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं होत आहे. (Arvind Kejriwal Latest News)

झालेल्या प्रकारबाबक दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपवर टीका केली असून भाजपचे लोक जनतेच्या नेत्याला लोकांमध्ये जाण्यापासून रोखत आहेत. अरविंद केजरीवाल जनतेत जाण्याची भाजपला भीती आहे,' अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. झालेल्या या घटनेबाबत दिल्लीतील भाजप नेते कपिल मिश्रा यांनीही ट्विट करत केजरीवालांवर टीका केली असून 'गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने केजरीवाल यांना विशेष संरक्षण देण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. केजरीवाल यांच्यावर हिंसक हल्ला होऊ शकतो,असे पत्रात म्हटले होते. केजरीवालांकडे 32 सरकारी वाहने आहेत. मग असा तमाशा करणं म्हणजे लज्जास्पद,' अशा शब्दात त्यांनी केजरीवालांवर टीका केली आहे.

दरम्यान ऑटो चालकांशी संवाद साधताना ऑटोचालक विक्रम ललतानी यांनी केजरीवाल यांना म्हणाले की, मी आपला मोठा चाहता असून सोशल मीडियावर तुमचा एक व्हिडिओ बघितला आहे, ज्यामध्ये तुम्ही पंजाबमधील एका ऑटो चालकाच्या घरी जेवायला गेले होते. माझ्या पण घरी जेवायला याल का?, असा सवाल केजरीवाल यांना केला यावर केजरीव यांनी सहमती दर्शवली आणि म्हणाले की, पंजाब आणि इथलेही ऑटोवाले मला आवडतात. तुम्ही आठ वाजता माझ्या हॉटेलवर या, आम्ही तुमच्यासोबत ऑटोने तुमच्या घरी जेवायला येवू. मात्र, या दरम्यान ललतानीने आनंदाने मान्य केलं, मात्र त्याच्या ऑटोमधून केजरीवाल जात असतांना त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव गुजरात पोलिसांनी केजरीवालांना रोखले. यावर केजरीवाल चांगलेच संतापले आणि मला तुमची सुरक्षा नको म्हणत पोलिसांवर चांगलेच भडकले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT