Chitra Ramkrishna
Chitra Ramkrishna Sarkarnama
देश

कुंपणंच खात होतं शेत; चित्रा रामकृष्ण यांना नादाला लावलेल्या ‘योगी’चा पर्दाफाश

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) यांना नादाला लावून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या कथित योगीचा पर्दाफाश झाला आहे. याच गुढ योगीचा चित्रा यांच्यावर अनेक वर्षांपासून प्रभाव असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी सीबीआयच्या (CBI) हाती महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

सीबीआयने गुरूवारी रात्री उशिरा ‘एनएसई’चे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम (Anand Subramanian) यांना अटक केली आहे. सीबीआयने सुब्रम्हण्यमची यांची तीन दिवस चौकशी केली होती. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. एनडीटीव्हीला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुब्रमण्यम हाच कथित योगी असल्यासे स्पष्ट झाले आहे. (Share Market Updates)

सुब्रमण्यम हाच योगी बनून चित्रा यांच्याशी ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधत होता. सुब्रमण्यम यांची एनएसईमध्ये नियुक्ती हा चित्रा यानी योगीच्या सांगण्यावरून घेतलेल्या वादग्रस्त निर्णय़ होता. तसेच वेतन देतानाही अनियमितता दिसून आली आहे, असं सेबीच्या चौकशीत समोर आलं होतं. त्यानंतर सीबीआयने चित्रा यांच्यासह सुब्रमण्यम याचीही कसून चौकशी केली.

सीबीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुब्रमण्यम यांनी आपण योगी असल्याचे ईमेलच्या माध्यमातून चित्रा यांना पटवून दिले होते. सुब्रमण्यम यानेच rigyajursama@outlook हा मेल आयडी तयार केला होता. चित्रा यांच्याकडून याच मेलवर गोपनीय माहिती शेअर केली जात होती. २०१३ ते २०१६ या कालावधीत महत्वाची माहिती शेअर केल्याचे समोर आले आहे. यातील काही मेल सुब्रमण्यम यांनाही पाठवण्यात आले होते. याचे स्क्रीनशॉट सीबीआयने मिळवल्याचे एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चित्रा यांच्यासह सुब्रमण्यम आणि इतर काही अधिकाऱ्यांना सेबीने दंड ठोठावला होता. रामकृष्ण यांची गेल्या आठवड्यात कसून चौकशी केली होती. यात रामकृष्ण यांचे ई-मेल आणि अज्ञात योगीशी झालेल्या विशिष्ट भाषेतील संवादाचा उलगडा करण्यासाठी सुब्रमण्यम यांची चौकशी केली, मात्र तपासाला सहकार्य करत नसल्याने सुब्रमण्यम यांना सीबीआयने अटक केली. (NSE Scam News Updates)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT