Amit Shah
Amit Shah   Sarkarnama
देश

विधानसभेच्या पराभवानंतर पहिल्यांदा अमित शहा आजपासून पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा (Amit Shah)आजपासून दोन दिवस पश्चिम बंगालच्या (West Bengal) दौऱ्यावर आहेत. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ)च्या अनेक कार्यक्रमांना अमित शहा उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ते भाजपचे, आमदार, खासदार आणि अन्य नेत्यांनाही भेटणार आहेत.

अमित शहा यांच्या दौऱ्याची सुरवात दक्षिण बंगाल फ्रंटिअर येथून होणार आहे. या ठिकाणी सहा आधुनिक फ्लोटिंग बार्डर आउट-पोस्ट आणि सुंदरवन येथील बोट अॅम्बुलन्सचे शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहेत. हरिदासपूर येथील संग्रहालयाचे भूमिपूजन शहा यांच्या हस्ते होणार आहे.

सतलुज, नर्मदा, कावेरी, गंगा, साबरमती, कृष्णा परिसरातील दुर्गम भागात असलेल्या बीएसएफच्या आउट पोस्ट सुरु करण्यात आले आहे. बोट अॅम्बुलन्सच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे.

सिलीगुडी येथील रेल्वेच्या मैदानावर आज सांयकाळी सहा वाजता त्यांची जाहीर सभा होत आहेत. तर उद्या (शुक्रवारी) सकाळी कूचबिहार जिल्ह्यात सकाळी बीएसएफच्या जवानांशी अमित शहा संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारात पक्षाच्या खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीनंतर अमित शहा यांचा हा पहिला दौरा आहे. विधानसभा निवडणुक, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये नाराजी वातावरण आहे, या पार्श्वभूमीवर अमित शहा आपल्या आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना कुठला बुस्टर डोस देणार हे पाहणं महत्वाचा ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT