Gautam Adani, Pranav Adani Sarkarnama
देश

Gautam Adani News : गौतम अदानींना पुतण्यानंच आणलं गोत्यात? सरकारी संस्थेने केला गंभीर आरोप

Who is Pranav Adani? A Key Adani Group Executive : प्रणव अदानी यांनी 2021 मध्ये अदानी ग्रीनकडून एसबी एनर्जी होल्डिंग ही कंपनी विकत घेण्याबाबतची गोपनीय माहिती आधीच लीक केली होती.

Rajanand More

Sebi News : उद्योगपती गौतम अदानी यांचे पुतणे प्रणव अदानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने प्रणव यांच्यावर गंभीर आरोप केली आहे. प्रणव अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळामध्ये आहे. त्यांनी शेअर बाजाराच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप सेबीने केला आहे.

सेबीने प्रणव यांच्यावर इन्सायडर ट्रेडिंगचा आरोप केला आहे. प्रणव अदानी यांनी 2021 मध्ये अदानी ग्रीनकडून एसबी एनर्जी होल्डिंग ही कंपनी विकत घेण्याबाबतची गोपनीय माहिती आधीच लीक केली होती. ही माहिती सार्वजनिक होण्याआधी नातेवाईकांनाच सांगण्यात आली, असा आरोप करत सेबीने मागीलवर्षी प्रणव यांनी नोटीस पाठविली होती.

प्रणव यांच्यावरील आरोप सिध्द झाल्यास त्यांच्यावर इन्सायडर ट्रेडिंगच्या आरोपाखाली कारवाई होऊ शकते. प्रणव यांनी गोपनीय माहिती त्यांचे मेव्हणे कुणाल शाह यांना दिली होती. त्यामुळे शाह बंधूंनी शेअर बाजारात त्यानुसार गुंतवणूक करत त्यातून तब्बल 90 लाख रुपये कमावल्याचा आरोप होत आहे. अदानी ग्रुपने 17 मे 2021 रोजी 3.5 अब्ज डॉलर किंमतीत एसबी एनर्जी ही कंपनी विकत घेतली आहे. रिन्युएबल एनर्जी क्षेत्रामध्ये ही भारतातील सर्वात मोठी डील मानली जाते.

प्रणव अदानी यांनी सेबीचे आरोप फेटाळले आहे. आपण कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचा दावा प्रणव यांनी केला आहे. तर शहा बंधुंनी वकिलांमार्फत म्हटले आहे की, गोपनीय माहिती मिळल्यामुळे किंवा कोणत्याही चुकीच्या हेतूने ट्रेडिंग केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ती माहिती आधीपासूनच सार्वजनिक होती, असा खुलासाही त्यांनी केला आहे.

इन्सायडर ट्रेडिंग म्हणजे काय?

प्रणव अदानी यांच्यावर आरोप होत असलेले इन्सायडर ट्रेडिंग काय असते, याची माहिती घेऊयात. एखाद्या कंपनीशी संबंधित गोपनीय माहिती सार्वजनिक होण्याआधीच त्याचा वापर शेअर बाजारात फायद्यासाठी करणे, म्हणजेच इन्सायडर ट्रेडिंग होय. कायद्यानुसार हा गुन्हा आहे. कंपन्यांची पारदर्शकता आणि विश्वासाला त्यामुळे तडा जाऊ शकतो. इतर गुंतवणूकदारांनाही त्याचा फटका बसू शकतो.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT