Prakash Jawdekar  Sarkarnama
देश

मी नवे नाव देतोय, "महाविश्वासघातकी आघाडी सरकार"

महाविकास आघाडी सरकारला २ वर्ष पुर्ण होत आहेत.

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : महाविकास आघाडी सरकारला २ वर्ष (2 Years of Mahavikas Aaghadi Government) पुर्ण होत आहेत. पण या काळात या सरकारने महाराष्ट्राला लुटायचे काम केले आहे आणि मतदारांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे हे केवळ महावसुली नाही तर, महाविश्वासघातकी सरकार आहे. असे म्हणत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरण ही या सरकारची ओळख आहे. अनेक मंत्र्यांची, नेत्यांची भ्रष्टाचारामध्ये चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आयकर विभागाचे छापे पडत आहेत. काही मंत्र्यांनी तर दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली. काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिली अशीही टीका जावडेकरांनी केली.

राज्य सरकारला २ वर्ष पूर्ण झाली. पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली. कधी काळी लस नव्हती म्हणून राज्य रडत होते, पण आता हेच राज्य लस वाया घालवत आहे. सरकारने अमरावती, नांदेड, मालेगाव याठिकाणी हिंसाचार घडवण्यासाठी रझा अकादमीला मोकळा हात दिला. मराठा आणि ओबीसी आरक्षण याच सरकारने घालवले. या सगळ्यामुळे मी नवे नाव देतोय, महा विश्वासघातकी आघाडी सरकार. असे म्हणत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे कधी तरी मंत्रालयात जातात. त्यामुळे महाराष्ट्र पहिल्यांदाच अदृश्य आणि अपघाताने झालेल्या मुख्यमंत्र्यांचा अनुभव घेत आहे. २ वर्षाच्या काळात केंद्राने केलेली कामेही सरकारने आपल्या खात्यात मांडली. हे संधीसाधू सरकार आहे. गृहमंत्री ६ महिने फरार होते, आणि आता जेलमध्ये गेलेत, असे कोणते राज्य आहे? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त गायब होणे ही गोष्टही वाईट होती.

शरद पवार संरक्षण मंत्री असताना दाऊद गँगच्या अनिल शर्माला घेऊन सोबत विमानात प्रवास केला, तर महाराष्ट्राला ही गोष्ट सहन नाही झाली, त्यांना सत्तेतून बाहेर घालवले होते. आताही असे आरोप महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यावर होत आहेत. त्यामुळे जनताच हे सरकार पाडेल असेही जावडेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT