Basavaraj Bommai-B SYediyurappa
Basavaraj Bommai-B SYediyurappa Sarkarnama
देश

BJP News : पुढचा मुख्यमंत्री मीच होणार : भाजपत रंगणार शह-कटशहाचे राजकारण

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री मीच होणार आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. बोम्मई यांच्या या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बोम्मईंच्या या विधानामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा शह कटशहाचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. (I will also be the next Chief Minister : Basavaraj Bommai)

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी चित्रदुर्ग येथे बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, हे पक्षच ठरवेल, असे स्पष्ट केले होते. येडियुराप्पाच्या विधानानंतर बोम्मई यांनी हे वक्तव्य आल्याने भाजपत जोरदार राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. आगामी विधानसभा निवडणुका बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे भाजप नेत्यांनी आधीच जाहीर केले आहे.

दरम्यान, बोम्मई हे पुढील मुख्यमंत्री असतील, असे परिवहन मंत्री श्रीरामुलू यांनी वारंवार सांगितले आहे. तथापि, येडियुराप्पा आणि राज्यातील इतर प्रमुख भाजप नेत्यांनी बोम्मई पुढील मुख्यमंत्री असतील, असे कुठेही म्हटलेले नाही. निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच बोम्मई यांनी आपणच पुढील मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले आहे.

बागलकोट जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नलतवाडा शहरात विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि पायाभरणीसाठी मंगळवारी आलेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यासपीठावर तीन वेळा माईक बंद करून फोनवर संवाद साधला. नलतवाडा येथील शरण वीरेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री मंचावर येताच मोबाईल कॉल आला. बोम्मई यांचे फोनवर बोलणे संपताच कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री पुन्हा फोनवर व्यस्त झाले. त्यानंतर सत्कार करत असतानाही त्यांना फोन आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT