ICMR Study on mixing Covaxin & Covishield shows better result
ICMR Study on mixing Covaxin & Covishield shows better result 
देश

कोव्हॅक्सिन अन् कोविशिल्डच्या कॉकटेलबाबत ICMR ने दिली खूशखबर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनापासून (Covid-19) संरक्षणासाठी भारतात सध्या कोणत्याही एका लशीचे दोन डोस घ्यावे लागत आहेत. त्यामुळं अनेकदा त्यात लशीचा डोस मिळवण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कोणत्याही लशीचे दोन डोस घेण्याबाबत जगभरात अभ्यास सुरू आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही (ICMR) कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींच्या कॉकटेलबाबत अभ्यास केला असून त्यातून महत्वाची माहिती समोर आली आहे. (ICMR Study on mixing Covaxin & Covishield shows better result)

आयसीएमआरकडून उत्तर प्रदेशात मे आणि जून महिन्यात हा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींचे प्रत्येकी एक-एक डोस नागरिकांना दिल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. त्यातून कोरोना विषाणूविरुध्द लढण्यासाठी परिणामकारक प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. हे कॉकटेल सुरक्षित असल्याचा दावाही या अभ्यासात करण्यात आला आहे.

अशाप्रकारच्या कॉकटेलमुळं एखाद्या लशीच्या तुटवड्याबाबत अडचणीही येणार नाही. तसेच ज्या ठिकाणी एकाहून अधिक कंपनीच्या लशी दिल्या जातात  तिथेही गोंधळ उडणार नाही, असेही अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी जुलै महिन्यात लशींच्या कॉकटेलबाबत काहीशी भितीही व्यक्त केली होती. सध्या लशींच्या मिक्सिंगचा पुरेसा अभ्यास नसून त्या सुरक्षित असल्याबाबतचे पुरावेही नाहीत. जर लोक स्वत:हून कोणती लस, कधी घ्यायची हे ठरवू लागले तर ते धोकादायक ठरेल, असेही त्या म्हणाल्या होत्या. 

दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सनच्या (Johnson & Johnson) सिंगल डोस कोरोना लशीच्या वापराला भारत सरकारने परवानगी दिली आहे. याबाबत आरोग्य मंत्री मांडवीय यांनी म्हटले आहे की, भारताने आणखी एक कोरोना लस नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या सिंगल डोस कोरोना लशीच्या तातडीच्या वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. देशात सध्या 5 कोरोना लशी उपलब्ध आहेत. देशातील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या माध्यमातून या लशीचा पुरवठा होणार आहे.  

देशात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या चार लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT