Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
देश

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कराल तर कारवाई : सत्तारांचा शिवसेनेला इशारा

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राजधानी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना, दसरा मेळावा, आदित्य ठाकरे, पाऊस, लम्पी आजारासह इतर अनेक मुद्द्यांवर त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.

दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात मागील अनेक दिवसांपासून वाद घडून येत आहेत. परवानगी मिळाली नाही तर शिवाजी पार्क मैदानात घुसून दसरा मेळावा घेऊ असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला होता. यावरूनच आता सत्तार यांनीही शिवसेनेला इशारा दिला आहे. 'कोण घुसखोरी करतो ? घुसखोरी केली तर, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर संबधितावर कारवाई होईल, असा सूचक वक्तव्य सत्तार यांनी केले. मुंबईच्या दसऱ्या मेळाव्याची आमच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. बीकेसी मैदानावर आमची ऐतिहासिक सभा होणार, शिवाजी पार्क मैदानाबद्दल न्यायालय निर्णय देईल, असेही सत्तार म्हणाले.

यावेळी सत्तार यांनी तेजस ठाकरे यांच्यावरही भाष्य केले. तेजस ठाकरे यांना आगामी सभांमधून शिवसेनेकडून पुढे आणले जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. यावर सत्तार म्हणाले की, जुन्या चेहऱ्यांना लोक पसंत करत नसतील, म्हणून नवीन चेहरे समोर आणावे लागत आहेत. जुन्या नेत्यांना लोक पसंत करीत नसतात. जळगावमधील सभा जनता पाहत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राने अडीच वर्षात पाहीला नसेल. सरकारने तात्काळ मदत जाहीर केली आहे. एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना १ कोटीचा निधी दिला आहे. लसीकरणाचं काम सुरू आहे. आज केंद्र सरकारकडे मागणी करण्यासाठी दिल्लीत आलो आहे. लम्पी आजाराला एनडीआरएफमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सत्तार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT