baba ramdev
baba ramdev 
देश

रामदेवबाबांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी : IMA म्हणाली आता खूप झाले....

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली ः ॲलोपॅथी उपचारांवर टीका करणे योगगुरू रामदेवबाबा (Ramdevbaba) यांना चांगलेच महागात पडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र इंडियन मेडिकल असोसिएशनकडून (IMA) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Health minister Dr. Harshwardhan) यांना लिहिण्यात आले आहे.(IMA Demands criminal action against Yogguru Ramdev)

‘‘रामदेव यांच्यावर साथरोग कायद्यान्वये गुन्हा दाखल करा किंवा त्यांच्या आरोपांचा स्वीकार करत सर्व अत्याधुनिक अॅलोपॅथी उपचार केंद्रे बंद करा.’’ अशी टोकाची भूमिका संघटनेने घेतल्याने केंद्र सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

‘रामदेवबाबांचे बेताल आरोप आता पुरे झाले’ असा इशारा देतानाच ‘आयएमए’ने या संसर्गकाळाचा वारंवार गैरफायदा घेत ते लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असून या माध्यमातून स्वतःची बेकायदा औषधे विकण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. मध्यंतरी रामदेवबाबा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता त्यात ॲलोपॅथी उपचारांची खिल्ली उडवितानाच त्यांनी लोकांच्या मृत्यूला देखील हीच उपचारपद्धती कारणीभूत असल्याचा आरोप होता. काही अॅलोपॅथी औषधांना देखील त्यांनी आक्षेप घेतला होता.

आयएमए म्हणते
रामदेवबाबा यांनी आधीच डॉक्टरांना खुनी ठरविले
स्वतः रामदेव, बालकृष्ण हे ॲलोपॅथीचे उपचार घेतात
बेताल विधानामुळे आरोग्य मंत्रालयावर प्रश्‍नचिन्ह
रामदेव यांच्या वक्तव्यांचा लोकांवर परिणाम होतोय
आरोग्य मंत्रालय, औषध नियंत्रकांना रामदेव यांचे आव्हान
रामदेवबाबांमुळे हजारो लोकांचे प्राण संकटामध्ये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT