INDIA Alliance Meeting Sarkarnama
देश

INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; जागावाटपावर होणार निर्णय होणार?

Chetan Zadpe

Delhi News : लोकसभा निवडणुका अगदी नजीक येऊन ठेपलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. भाजप विरोधकांच्या इंडिया आघाडीने आता निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली सुरु केल्या आहेत. विरोधी आघाडीच्या नेत्यांची आज (13 जानेवारी) बैठक होणार आहे. 14 जानेवारी पासून खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या न्याय यात्रेला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी, ही बैठक होत असल्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़. (Latest Marathi News)

भारत जोडो न्याय यात्रेवर चर्चा होणार आहे -

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी 12 जानेवारी रोजी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये सांगितले, 'इंडिया आघाडीचे नेते उद्या, 13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता ऑनलाईन पद्धतीने भेटतील. ते विविध मुद्द्यांचा आढावा घेतील, यावेळी लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चाही करण्यात येईल.

बैठकीत समन्वयक ठरवता येईल -

लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. आघाडीतील अनेक घटक पक्षांकडून काँग्रेसवर समन्वयक बनवण्यासाठी दावेदारी केली जात असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत समन्वयक ठरवण्याचा निर्णय आजच्या इंडिया आभासी बैठकीत घेतला जाऊ शकतो. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजक बनवण्यासाठी जेडीयूकडून मागणी केली जात आहे.

अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठक बोलावली -

मणिपूरमध्ये 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राहुल गांधींच्या न्याय यात्रेच्या एक दिवस आधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सकाळी 11.30 वाजता 'इंडिया आघाडी'च्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जागांवर आणि समन्वयक पदाबाबत चर्चा होणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT