Bipin Rawat
Bipin Rawat Sarkarnama
देश

बिपीन रावत यांच्या निधनाचा चटका; या महत्वाच्या व्यक्तींसाठीही हवाईप्रवास ठरला अखेरचा!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कुन्नूर (तामिळनाडू) येथे लष्कराचे हेलिकॉप्टर ( helicopter crash) कोसळले. यात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत देखील उपस्थित होते. बिपिन रावत (Bipin Rawat) यांचाही मृत्यू झाल्याची घोषणा सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास करण्यात आली. आर्मी काॅलेजच्या दीक्षांत समारंभात ते सहभागी होणार होते. पण त्यापूर्वीच त्यांचे अपघातात निधन झाले. या पूर्वीही काही महत्वाच्या व्यक्तींचा हेलिकॉप्टर किंवा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांचा घेतलेला आढावा..

Sanjay Gandhi

संजय गांधी

देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी (Sanjay Gandhi)यांचा २३ जून १९८० रोजी नवी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळाजवळ विमान अपघातात मृत्यू झाला होता. 1977 पासून गांधी कुटुंबाच्या जवळचे धीरेंद्र ब्रह्मचारी 'पिट्स एस 2 ए' नावाचे दोन आसनी विमान आयात करण्याचा प्रयत्न करत होते, जे खास हवेत कसरती करण्यासाठीच बनवले गेले होते. मे 1980 मध्ये भारतीय सीमा शुल्क विभागाने 'पिट्स एस 2 ए' या विमानाला भारतात आणण्यासाठी मान्यता दिली. विमान असेंबल करून तात्काळ सफदरजंग विमानतळावरील दिल्ली फ्लाईंग क्लबमध्ये नेण्यात आले. हे विमानात संजय गांधी यांचा मृत्यू झाला होता. काही दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, ज्या दिवशी राजीव यांचे बंधू संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले, त्या दिवशी राजीव यांनी त्यांना ‘पिट्स’सारखे आक्रमक विमान उडवण्यास मनाई केली होती. पण त्यांनी ऐकले नाही. माझ्या काकांना तेवढा अनुभव नव्हता. काकांना केवळ तीन ते साडेतीन तास विमान उडवण्याचा अनुभव होता. संजय गांधी हे राजीव गांधी यांचे धाकटे बंधु होते. इंदिरा गांधींचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते होते.

YS Rajasekhara Reddy

वायएस राजशेखर रेड्डी

आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी (YS Rajasekhara Reddy) यांचे हेलिकॅाफ्टर अपघातात निधन झाले होते. त्याचे हेलिकॉफ्टर बेपत्ता झाले होते. दुसऱ्या दिवशी वायुदलाला त्यांच्या हेलिकॉफ्टरचे अवशेष मिळाले होते. या अपघातात त्यांचे मुख्य सचिव पी सुब्रुह्यण्यम, मुख्य सुरक्षा अधिकारी एएससी वायएसआर रेड्डी यांचे मुख्य सचिव पी सुब्रह्मण्यम, मुख्य सुरक्षा अधिकारी एएससी जॉन वेस्ली, मुख्य पायलट एसके भाटिया आणि सहायक पायलट एमएस रेड्डी यांचाही मृत्यू झाला होता. २००९मध्ये ही घटना घडली होती. आंध्र प्रदेशातील रुद्रकोंडा येथे हा अपघात झाला होता.

Deepak Sathe

दीपक साठे

गेल्या वर्षी आॉगस्ट महिन्यात केरळच्या कोळीकोडमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन 18 जणांचा मृत्यू झाला होता. एअर इंडिया एक्स्प्रेसचं हे विमान होतं. केरळच्या कोळीकोडमध्ये झालेल्या विमान अपघातात मुंबईकर दीपक साठे (Deepak Sathe) या अनुभवी पायलटचा मृत्यू झाला होता. दीपक यांचे वडील कर्नल वसंत साठे हे सैन्यात होते तर मोठा भाऊ सुद्धा सैन्यात होता. एअर इंडिया एक्स्प्रेसचं हे विमान होतं. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त विमानाचं त्यांनी दोन वेळा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी विमान उतरवलं पण त्याला अपघात झाला. धावपट्टीवर पाणी साचलं होतं, तसंच सतत पाऊस सुरू होता. त्यामुळे हा अपघात झाल्या असावा, अशी माहिती आहे. "माझा मुलगा अतिशय कर्तृत्ववान होता आणि सर्व गोष्टीत तो परिपूर्ण होता, देव चांगल्या लोकांनाच आधी घेऊन जातो"अशी भावना लीलाताई साठे यांनी व्यक्त केली.

Madhavrao Shinde

माधवराव शिंदे

उत्तर प्रदेशातील मणिपुरी जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे( Madhavrao Shinde) यांचंही अकाली निधन झालं होतं. 30 सप्टेंबर 2001 रोजी वयाच्या 56 व्या वर्षी त्यांची अखेर झाली. शिंदे प्रवास करत असलेलं खाजगी विमान कोसळून आठही जणांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांचे स्वीय सचिव रुपिंदर सिंह, ‘इंडियन एक्स्प्रेस’चे पत्रकार संजीव सिन्हा, ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या पत्रकार अंजू शर्मा आणि गोपाल बिष्ट, ‘आज तक’चे पत्रकार रंजन झा, पायलट राय गौतम आणि को-पायलट रितू मलिक यांचा समावेश होता. ज्योतिरादित्य शिंदे त्यांचे पुत्र आहेत. वडीलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

GMC Balayogi

जीएमसी बालयोगी

लोकसभेचे अध्यक्ष असलेल्या जीएमसी बालयोगी (GMC Balayogi) यांचा आंध्र प्रदेशात विमान कोसळून मृत्यू झाला. ३ मार्च २००२ मध्ये बालयोगी हे ‘बेल २०६’ या हेलिकॉप्टरने प्रवास करीत होते. त्यांचे हेलिकॉप्टर कृष्णा जिल्ह्यातील कैकालूर भागात कोसळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT