Pakistan PM Imran Khan, Pakistan political crisis News Sarkarnama
देश

पाकिस्तानच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी; मित्र पक्षांच्या धक्याने इम्रान खान घायाळ!

Imran Khan | Pakistan Tehreek-e-Insaf | Pakistan Political crises : इम्रान खान यांची खू्र्ची जाणं निश्नीत

सरकारनामा ब्युरो

इस्लामाबाद : सत्ता वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान (Imran Khan) खान यांना मोठा धक्का बसला आहे. इम्रान खान यांचा दोन नंबरचा सहयोगी पक्ष मुताहिदा क्वामी मुव्हमेंट पाकिस्तान (MQM P | एमक्यूएम पी) पक्षाने अविश्वास प्रस्तावावर इम्रान खान यांच्या विरोधात मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. विरोधी पक्षांच्या गटासोबत झालेल्या एका बैठकीनंतर 'एमक्यूएम पी' ने एका मसुद्यावर सही करुन हा निर्णय जाहीर केला आहे. (Pakistan political crisis News)

७ सदस्य असलेल्या 'एमक्यूएम पी' ने इम्रान खान यांची साथ सोडल्याने आता त्यांना पाठिंबा असलेल्या सदस्यांची संख्या १६४ पर्यंत घसरली आहे. तर विरोधकांचे संख्याबळ तब्बल १७७ झाले आहे. बहुमतासाठी १७२ हा जादूई आकडा आहे. त्यामुळे इम्रान खान यांची उचलबांगडी निश्चीत मानली जात आहे. याशिवाय आता विरोधकांना इम्रान खान यांच्या पक्षातील बंडखोर सदस्यांची देखील गरज राहिलेली नाही.

यापूर्वी इम्रान खान सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाहजान बुग्ती (Shahjan Bugti) यांनीही राजीनामा दिला आहे. बुग्ती हे बलूचिस्तानमधील जम्हूरी वतन पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी रविवारी पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) जरदारी यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथ होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

SCROLL FOR NEXT