Pramod Sawant-Dharmesh Saglani Sarkarnama
देश

कॉंग्रेस राज्यपालांच्या भेटीला जाताच भाजपने थेट शपथविधीची तारीखच जाहीर करुन टाकली

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी (Pramod Sawant) साखळी मतदार संघातून अखेर विजय मिळवला आहे, तर काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी पराभूत झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून या विधानसभा निवडणुकीसाठी उभे होते. मतमोजणीच्या पहिल्या काही टप्प्यांमध्ये ते पिछाडीवर होते, त्यामुळे भाजपची धाकधुक वाढली होती. तर धर्मेश सगलानी हे आघाडीवर होते. पण पुढील टप्प्यांमध्ये मुख्यमंत्री सावंतांनी आघाडी घेत विजय मिळवला.

गोव्यात एकीकडे भाजपचा विजय जवळपास निश्चित असताना भाजपने राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वेळची चुक टाळण्यासाठी यावेळी कॉंग्रेसने आधीच राज्यपालांची भेट घेण्याचे ठरवले आहे. निकालातून आलेले कॉंग्रेसच्या विजयी उमेदवारांची संख्या पाहता कॉंग्रेस गोव्यात सत्ता स्थापन करेल हे अवघड आहे. मात्र राजकारणात काहीही होऊ शकते. यामुळे त्यांनी ही तयारी केलेली दिसते. दुसरीकडे, कॉंग्रेसची खेळी बघता, भाजपने तर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीखच जाहीर केली आहे. येत्या १४ मार्चला शपथविधी होणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. त्याचसोबत त्यांनी मगोपलाही सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे.

दरम्यान, गोवा काँग्रेसच्या नेत्यांनी निकालापूर्वीच राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांच्या भेटीची वेळ मागितली होती. गोव्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आपण सत्तास्थापनेचा दावा करु शकतो, असा विश्वास कॉंग्रेसने व्यक्त आहे. तर काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना काठावरचे बहुमत मिळाल्यास राज्यपाल सत्तास्थापनेसाठी पहिल्यांदा कोणाला निमंत्रण देतात, हे महत्त्वाचे आहे, हा फॅक्टर लक्षात घेऊनच काँग्रेसने निकालापूर्वीच राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राज्यपाल कोणाला सत्तास्थापनेसाठी वेळ देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT