Karnataka New CM:  Sarkarnama
देश

Karnataka New CM: कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा पेच; 'या' मुद्द्याच्या आधारावर होणार निर्णय

National Politics News: कोणाचं पारडं जड तर कोणाचं हलकं...

सरकारनामा ब्युरो

Karnataka CM News: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 च्या (Karnataka Elections 2023) निकालात काँग्रेसच्या प्रचंड विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार? या संदर्भात रविवारी (ता. 14) विधिमंडळ पक्षाच्या पर्यवेक्षकांची बैठक झाली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेत्याची निवड करण्यासाठी ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (In Karnataka, the Chief Minister will be selected on the basis of 'these' issues)

एकीकडे सिद्धरामय्या यांचे पारडे जड मानले जात आहे. पण दुसरीकडे डीके शिवकुमार हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी दावा सांगत आहेत. त्यामुळे सध्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. जर अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर देण्यात आली तर डीके शिवकुमार पक्षाकडे याची अधिकृतरित्या घोषणा करण्याची मागणी करु शकतात. पण पक्षातील काही सुत्रांच्या माहितीनुसार, डीके शिवकुमार, उपमुख्यमंत्रीपदासह मंत्रिमंडाळात काही महत्त्वाची खाती मागू शकतात. याशिवाय ते आपल्या लोकांना मंत्रिमंडळात सर्वाधिक जागा देण्याचीही मागणी करु शकतात. (Karnatak Election 2023-DK Shivkumar)

याशिवाय, डीके शिवकुमार यांच्या गोटात ६८ आमदार आहेत, तर सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांना ५९ आमदारांचे समर्थ आहे तर इतर आठ आमदारांचा जी परमेश्वर यांना पाठिंबा आहे. सामाजिक जनाधार आणि लोकप्रियतेमुळे सिद्धारामय्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुढे आहेत. पण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे डीके शिवकुमार यांची बाजू कमजोर दिसत आहे. या सर्व कारणांमुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा पेच सध्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर आहे. खर्गेंनी पर्यवेक्षक मंडळ गठित करुन आमदारांना त्यांचे म्हणणे या मंडळाकडे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. मंडळाच्या अहवालानंतर यावर निर्णय़ घेण्यात येणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT