RSS Chief Mohan Bhagwat, Mohan Bhagwat on Akhanda Bharat dream
RSS Chief Mohan Bhagwat, Mohan Bhagwat on Akhanda Bharat dream 
देश

'येत्या 20 ते 25 वर्षांत पुन्हा अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार होईल'- मोहन भागवत

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : हजार वर्षांपासून भारतातील (India) सनातन धर्म संपुष्टात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले पण हिंदू (Hindu) राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. येत्या 20 ते 25 वर्षांत पुन्हा एकदा अखंड हिंदुस्थान तयार होईल आणि थोडा प्रयत्न केला तर स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद यांच्या स्वप्नांतील अखंड हिंदूस्तानचे स्वप्न साकार होईल, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केला. इतकेच नव्हे तर, जे कोणी या कार्याच्या मध्ये होईल त्याचा नाश होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Mohan Bhagwat on Akhanda Bharat)

हरिद्वार येथे आयोजित ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी दिव्यानंद गिरी यांची मूर्ती, प्राण प्रतिष्ठा आणि गुरुत्रय मंदिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले, "स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविद यांच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार होण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज आहे.आमचे कोणाशीही शत्रुत्व नाही. आम्ही अहिंसेची भाषाही बोलू, पण हातात काठी ठेवू. जगाला सत्तेची आणि बळाची भाषा कळते. असेही सरसंघचालक भागवत यावेळी म्हणाले.

आजचा भारत हा मर्यादित भूभाग असलेला देश आहे. असे म्हणतात की, भारत एकेकाळी विशाल भूभाग होता. ते केवळ कन्याकुमारी ते काश्मीर आणि गुजरात ते आसामपर्यंत मर्यादित नव्हते. तर अखंड भारतामध्ये अफगाणिस्तान, भूतान, म्यानमार, तिबेट, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड यांचा समावेश होता. पण काही देश फार पूर्वीच भारतापासून वेगळे झाले. तर पाकिस्तान आणि बांगलादेश स्वातंत्र्याच्या वेळी भारतापासून वेगळे देश झाले, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

गेल्या एक हजार वर्षांपासून भारतातील सनातन धर्म संपवण्याचे प्रयत्न झाले, पण ज्यांनी असा प्रयत्न केला ते लोक नाहीसे झाले. पण आजही आपण आणि सनातन धर्म इथेच आहोत, हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. दिवसेंदिवस आपले राष्ट्रीयत्व गंगेच्या प्रवाहाप्रमाणे वाहत आहे. जोपर्यंत राष्ट्र आहे, तोपर्यंत धर्म आहे आणि धर्माच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले तरच अखंड भारताचा उदय होईल. असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT