Budget 2023 | Nirmala Sitaraman Sarkarnama
देश

Budget 2023 : मध्यमवर्गीयांसाठी केंद्रसरकारची मोठी घोषणा; 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Union Budget: ''केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली आहे. नवीन प्रणालीमध्ये 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागणार नाही. आतापर्यंत आता ही मर्यादा ५ लाख रुपये होती.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू झाले. आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहेत. मंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठीही मोठी घोषणा केली आहे.

शुन्य ते तीन लाख उत्पन्न असलेल्यांना करातून सुट देण्यात आली आहे. तीन ते सहा लाख उत्पन्नावर पाच टक्के कर भरावा लागणार आहे. सहा ते नऊ लाख उत्पन्न असलेल्यांना १० टक्के कर भरावा लागणार आहे. नऊ ते बारा लाखांचे उत्पन्न असलेल्याना १५ टक्के कर भरावा लागणार आहे. १२ ते १५ लाखांचे उत्पन्न असलेल्यांना १० तर १५ लाखांच्यावर उत्पन्न असलेल्याना २० टक्के कर भरावा लागणार आहे.

नव्या करप्रणालीत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जाणार नाही. या अंतर्गत, कर सवलत 7 लाख रुपये करण्यात आली आहे, म्हणजेच 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2020 मध्ये 2.5 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या उत्पन्नासह 6 उत्पन्न स्लॅबसह नवीन वैयक्तिक आयकर व्यवस्था सुरू करण्यात आली होती. आता या अर्थसंकल्पात स्लॅब कमी करून पाच करण्यात आले असून कर सवलतीची मर्यादा 3 लाख रुपये करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT