narendra modi (1).jpg sarkarnama
देश

Independence Day 2024 : वैद्यकीय क्षेत्राबाबत लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; काय म्हणाले?

PM Narendra Modi Independence Day Speech : फक्त 40 कोटी लोकांनी जगातील महासत्तेला उलथून लावलं होतं. आज तर आपण 140 कोटी आहोत, असं मोदींनी म्हटलं.

Akshay Sabale

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं.

पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलेच भाषण आहे. तर सलग 11 व्यांदा ते देशाला संबोधित करत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वैद्यकीय क्षेत्राबाबत मोठी घोषणा केली आहे.

"देशातील तरूण वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात जात आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात पुढील पाच वर्षांच्या कालावधीत 75 हजार नव्या जागा वाढविण्यात येणार आहे," असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "अर्थसंकलपात 1 लाख कोटी रूपये संशोधनासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक तरूण वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात जात आहेत. त्यातील अनेक तरूण मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यासाठी त्यांचे लाखो आणि करोडो रूपये खर्च होतात. त्यामुळे 10 वर्षात वैद्यकीय क्षेत्रातील जागा वाढवून 1 लाख केल्या आहेत. 25 हजार तरूण वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात जातात. त्यामुळे पुढील पाच वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार नव्या जागा वाढवणार आहोत."

"गेल्या दशकात रस्ते, रेल्वे, महामार्ग, शाळा-महाविद्यालये, रूग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, अमृत सरोवर, दोन लाख पंचायतींनी ऑप्टिकल फायबर, चार कोटी पक्की घरे, अशा सुविधा निर्माण झाल्या आहेत. आपण पायाभूत सुविधांवर काम केले आहे," असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

"देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी 40 कोटी लोकांनी स्वातंत्र्याचा लढा लढला. त्यांनी सामर्थ्य दाखवलं. त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं. लढत राहिले. त्यांच्या मुखी 'वंदे मातरम' हा एकच स्वर होता. आम्हाला गर्व आहे की, आमच्यात त्यांचेच रक्त आहे. फक्त 40 कोटी लोकांनी जगातील महासत्तेला उलथून लावलं होतं. आज तर आपण 140 कोटी आहोत," असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT