narendra modi.jpg sarkarnama
देश

Independence Day 2024 : 'समृद्ध' अन् 'विकसित' भारताचे स्वप्न कसे पूर्ण करणार? पंतप्रधान मोदी म्हणाले...

Independence Day 2024 PM Narendra Modi : 'विकसित भारत 2047' हे फक्त भाषणाचे शब्द नाहीत. यासाठी कठोर परिश्रम घेतले जात आहे, असं मोदींनी सांगितलं.

Akshay Sabale

Independence Day 2024 : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. यानंतर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकसित भारता'चे स्वप्न पूर्ण करू शकतो, असं म्हटलं आहे. त्यासाठी आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी 40 कोटी लोकांनी स्वातंत्र्याचा लढा लढला. त्यांनी सामर्थ्य दाखवलं. त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं. लढत राहिले. त्यांच्या मुखी 'वंदे मातरम' हा एकच स्वर होता. आम्हाला गर्व आहे की, आमच्यात त्यांचेच रक्त आहे. फक्त 40 कोटी लोकांनी जगातील महासत्तेला उलथून लावलं होतं. आज तर आपण 140 कोटी आहोत.

"देशातील 140 कोटी लोकांनी एक संकल्प करून, लक्ष्य ठरवून आणि खांद्याला खांदा मिळवून चाललो, तरी आपण प्रत्येक संकटावर मात करून 'समृद्ध भारत' बनवू शकतो. 2024 पर्यंत 'विकसित भारता'चे लक्ष्य पूर्ण करू शकतो," असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

"देशासाठी बलिदान देण्याची प्रतिबद्धता स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते. तर, देशासाठी जगण्याची प्रतिबद्धती समृद्ध भारत बनवू शकते. 'विकसित भारत 2047' हे फक्त भाषणाचे शब्द नाहीत. यासाठी कठोर परिश्रम घेतले जात आहे. देशातील कोट्यावधी नागरिकांचे मत जाणून घेतले जात आहेत," असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT